गुहागर : तालुक्यातील वाघांबे गावचे मुळ रहिवासी असणारे श्री शंकर निंबरे हे रोजगाराच्या निमित्ताने मुंबई विरार येथे रिक्षा व्यवसाय करतात. 6 नोव्हेंबर 2021 रोजी भाऊबीजेच्या दिवशी त्यांच्या रिक्षामधुन प्रवास करणा-या एका प्रवाशाची 50 हजार रुपये असलेली बॅग विसरभोळेपणाने राहुन गेली. शंकर निंबरे यांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी अतिशय प्रामाणिक पणे ती 50 हजार रुपये असलेली बॅग त्या संबंधित प्रवाशाला परत केली.
Natives of Waghambe village A passenger traveling in Shankar Nimbare’s rickshaw lost his bag containing Rs 50,000 by mistake. As soon as Shankar Nimbare came to know about this, he very honestly returned the bag containing Rs. 50,000 to the concerned passenger.
त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक होत असतानाच गुहागर तालुक्यातील नरवण गावचे सुपुत्र आणि रत्नागिरी जिल्हा भाजपा ओबीसी सेलचे अध्यक्ष सन्माननीय संतोषी जैतापकर हे एसएमएस सुपर मार्केट यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विरार येथे आलेले असताना त्यांनी शंकर निंबरे यांची भेट घेऊन त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल रोख रुपये पाच हजार रुपयांचे बक्षीस देऊन शंकर निंबरे यांचा सत्कार केला. समाजातील आपल्या परीसरातील बांधवाने दाखविलेला प्रामाणिकपणा आणि त्याचे कौतुक करत निंबरे यांना दिलेले रोख रकमेचे पारितोषिक या जैतापकर यांच्या दिलदार वृत्तीचे मुंबई आणि ग्रामीण भागातुन कौतुक होत आहे.