गुहागर : रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या २८ स्थानिक कर्मचाऱ्यांच्या नोकरीचा निर्माण झालेला प्रश्न आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी गेल्या आठवडयात थेट कंपनीमध्ये बैठक घेवून सोडवला आणि त्यांना मोठा दिलासा दिला. त्यानंतर गुहागर शहरात बैठक व विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने आलेल्या आमदार श्री. जाधव यांची आरजीपीपीएलमधील कर्मचाऱ्यांनी आ. जाधव यांचे आभार मानले.
यावेळी आरजीपीपीएल कर्मचारी प्रणय मोरे, मयुरेश डेरे, विशाल भोसले, प्रवीण रहाटे, नितीन दीक्षित, शीतल पाटील, नेताजी पाटील, निलेश पदाले, अंकुश पागडे, धनंजय भाटकर, प्रवीण वेल्हाळ, अभिजित खडपे, गौरव भिंगार्डे, शाम घाडे, प्रसन्न कामत, धीरज कदम, सौरभ मपारा, मुक्तानंद वरवडेकर, दिनेश गोंधळेकर, रूपेश फटकारे, संजय पावसकर आदी या कर्मचाऱ्यांचनी भेट घेतली आणि त्यांचे आभार मानले.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. महेश नाटेकर, श्री. विनायक मुळे, माजी नगराध्यक्ष श्री. जयदेव मोरे, शहर प्रमुख श्री नीलेश मोरे, श्री. विनायक जाधव, श्री. दिपक कनगुटकर आदी उपस्थित होते.