वेलदुर- अंजनवेल- रानवी विद्युत प्रकल्प लोकहक्क समितीचे ऊर्जामंत्र्यांना निवेदन
गुहागर : खाडीपट्यात असलेल्या वेलदुर, अंजनवेल, रानवी गावात दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होत असताना येथील रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रा. लि. कंपनीकडून प्रकल्पासाठी या तिन्ही गावातील नैसर्गिक स्त्रोताचा दुरुपयोग केले जात आहे. या प्रकारामुळे भविष्यात तिन्ही गावांना पिण्याच्या पाण्याच्या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. कंपनीच्या या कृतीची चौकशी होऊन कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी वेलदुर- अंजनवेल- रानवी विद्युत प्रकल्प लोकहक्क समितीने केंद्रीय ऊर्जामंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
The villages of Veldur, Anjanvel and Ranvi in the bay are facing severe water shortage every summer. Ratnagiri Gas and Power Pvt. Ltd. The company is misusing the natural resources of these three villages for the project. The Veldur-Anjanvel-Ranvi Power Project People’s Rights Committee has demanded in a statement to the Union Energy Minister that the company’s action be investigated and strict action be taken.


या निवेदनात म्हटले आहे की, सन १९९९ मध्ये अंजनवेल – वेलदूर- रानवी येथील पिण्याचे नैसर्गिक स्त्रोत प्रदुषीत झाले होते. त्यावेळी त्यावेळच्या वेलदूर-अंजनवेल-रानवी विद्युत प्रकल्प लोकहक्क समितीने दाभोळ वीज कंपनी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात रीट पेटीशन दाखल केले होते. त्यावेळी दाभोळ वीज कंपनीचे त्यावेळचे अध्यक्ष राम श्रीवास्तव यांनी मुंबई उच्च न्यायालयात दि. ७ एप्रिल १९९९ रोजी प्रतिज्ञापत्र सादर केले होते. या प्रतिज्ञापत्रात त्यांनी म्हटले होते की, दाभोळ वीज प्रकल्पासाठी कामगार वसाहतीत आणि स्टाफ कॉलनीत पिण्यासाठी पाणी गुहागर येथील मोडकाआगर येथून व प्रकल्पापासून सुमारे ५२ कि. मी. दुरवरुन चिपळूण तालुक्यातील शिरळ येथील वाशिष्टी नदीतून येथून पाईपलाईनने दाभोळ वीज कंपनी घेते. हे पाणी प्रकल्पाच्या ठिकाणी धरणात (रीझर्व्हर) मध्ये साठवून प्रकल्पासाठी ट्रीटमेंट करुन पाणी वापरले जाते असे त्यांनी सदर प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. सन २००५ -२००६ मध्ये हा प्रकल्प रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रा. लि. ने ताब्यात घेवून सुरु केला आहे. त्यानंतर काही वर्षे या प्रकल्पासाठी वाशिष्टी नदीतून पाईपलाईनने पाणी आणून कंपनी प्रकल्पाची कामगार वसाहतीतील कामगारांची व स्टाफ हाऊसींग कॉलनीतील लोकांची पाण्याची गरज भागवित होते. गेल्या काही वर्षापूर्वी कंपनीने वाशिष्टी नदीतून पाईपलाईनने पाणी आणणे बंद केले आहे. तसेच गुहागर येथील मोडका आगर येथून पाणी आणणेही बंद केले आहे. असे असताना प्रकल्प पाण्याविणा चालतो कसा ? कामगार वसाहत व स्टाफ हाऊसींग कॉलनीतील लोकांना पाणी कोठून मिळते ? हा खरा चौकशीचा व कारवाईचा विषय आहे.


रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रा. लि. ने काही वर्षापूर्वी आपल्या प्रकल्पक्षेत्रात ३ विंधन विहीरी पाडल्या आहेत. कातळवाडी फाटा – जूने कुलीग टॉवरजवळ – वेअर हाऊसजवळ १ विंधन विहीर, पायोनिअर कॅम्पजवळ- १ विंधन विहीर, एलएनटी ऑफीसजवळ- १ विंधन विहीर याशिवाय पावसाळ्यात अंजनवेल-वेलदूर-रानवी येथील प्रकल्प भागातून येणारे परे अडवून – बंधारे घालून पाणी अडविले जाते व या पऱ्यांतील पाणी पंप टाकून कंपनीतील पूर्वीच्या (नाफता, डिझेल) टाक्या भरून ठेवल्या जातात. काजळ पऱ्या येथील धरणात पाणी साठवले जाते व हे पाणी प्रकल्पासाठी कामगार वसाहतीत कामगारांसाठी व हाऊसींग कॉलनीतील स्टाफसाठी वापरले जाते. रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रा. लि. च्या अशा कृतीमुळे अंजनवेल – वेलदूर – रानवी येथील भुगर्भातील पाण्याचा साठा कमी होऊन या गावातील पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होत आहे. भविष्यात मोठी समस्या निर्माण होऊ शकते. रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रा. लि. अशाप्रकारचे वागण्यामुळे प्रकल्पग्रस्त गावे व गावातील जनता खुप त्रस्त झाली आहे. रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रा. लि. च्या वरील कृतीची चौकशी करुन कठोर कारवाई करावी व आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

