कबड्डीचा महासंग्राम : कोण पटकावणार अजिंक्यपद?
गुहागर, ता. 30 : आरजीपीपीएल वसाहतीमधील रत्नज्योती क्रिडांगणामध्ये सुरु असलेल्या कबड्डीच्या महासंग्रामात चिपळूण, दापोली, संगमेश्र्वर आणि रत्नागिरीच्या संघांनी बाजी मारली आहे. आज (ता. 30) या स्पर्धेतील उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे जिल्हा अजिंक्यपद कोण पटकावणार याची सर्वांना उत्सुकता आहे. RGPPL Kabaddi Competition
2012 मध्ये गुहागरमध्ये झालेल्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेला आरजीपीपीएलने प्रायोजकत्व दिले होते. त्यानंतर तब्बल 11 वर्षांनी एन.टी.पी.सी. कोकण एलएनजी आणि गेल यांच्या कंपन्याच्या मदतीने आरजीपीपीएल कंपनीने प्रथमच कबड्डीची जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर वगळता अन्य सर्व तालुक्यांचे कबड्डी संघ सहभागी झाले होते.
28 डिसेंबरला दापोली, रत्नागिरी, मंडणगड आणि गुहागर या संघाच्या गटात साखळी सामने झाले. त्यामध्ये रत्नागिरी आणि दापोली या दोन संघानी अव्वल गुण मिळवत बाद फेरीत प्रवेश केला. RGPPL Kabaddi Competition
29 डिसेंबरला चिपळूण, लांजा, खेड आणि संगमेश्र्वर या संघांच्या गटात साखळी सामने झाले. यामध्ये चिपळूण आणि संगमेश्र्वर या दोन संघांनी बाद फेरीत प्रवेश केला.
30 डिसेंबरला चिपळूण आणि दापोली तसेच संगमेश्र्वर आणि रत्नागिरी यांच्यामध्ये उपांत्यपूर्व फेरीच्या लढती होतील. या फेरीत जिंकणाऱ्या दोन संघांमध्ये अंतिम सामना होईल. तर उपांत्यपूर्व फेरीत हार पत्करावी लागणाऱ्या दोन संघांमध्ये तृतीय क्रमांकासाठी सामना होईल. RGPPL Kabaddi Competition


या स्पर्धेमध्ये आयोजक आणि जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्यात समन्वयक म्हणून भूमिका निभावणारे गुहागरचे नगरसेवक अमोल गोयथळे म्हणाले की, या स्पर्धांमुळे कबड्डीच्या खेळाडूंना एक नवे व्यासपीठ मिळाले आहे. कोकणातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या कबड्डीमधील थरार आरजीपीपीएलमधील अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पहाता आला. स्वाभाविकच यापुढे आरजीपीपीएलशी संबंधित कंपन्या स्थानिक खेळाडूंसाठी आणखी स्पर्धात्मक, प्रशिक्षणात्मक उपक्रम राबवू शकतात. RGPPL Kabaddi Competition
संबंधित बातमी : आरजीपीपीएलमध्ये रंगणार कबड्डीचा महासंग्राम
Live Matches on You Tube channer : JIMtax Gaming