गुहागर : गुहागर गावाची ग्रामदेवता श्री भैरी व्याघांबरी देवीच्या मंदिर परिसरात असलेल्या मानाच्या लाटेची पुनर्स्थापना करण्यात आली.
The honor pillar in the temple premises of Shri Bhairi Vyaghambari Devi, the village deity of Guhagar village, was restored.
देव दिवाळीचा सण रविवार दि. ५ डिसेंबर रोजी श्री भैरी व्याघ्रांबरी मंदीरात मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. या सणासाठी ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. यावर्षी लाटेची पुनर्स्थापना होत आहे. या लाटेचा मान हा पिढ्यानपिढ्या तेली समाजाचा असतो. या लाटेची उंची २० फूट आहे. या लाटेची भव्य मिरवणूक श्री संताजी जगनाडे मंदीर, तेलीवाडी पासून श्री भैरी व्याघ्रांबरी देवी मंदिरापर्यंत वाजत गाजत काढण्यात आली. यावेळी लाटेची पूजा करण्यात आली. तसेच देव दिवाळीच्या दिवशीही लाटेची विधिवत पूजन केले जाणार आहे.
यावेळी तेली युवक संघाचे अध्यक्ष अरुण रहाटे, उपाध्यक्ष अनिल राऊत, सह खजिनदार महेश रहाटे, माजी तालुका तेली समाज अध्यक्ष एकनाथ रहाटे, ग्रामदेवी श्री व्याघांबरी मंदिर कमिटीचे सल्लागार प्रभाकर रहाटे, सुरेश रहाटे, प्रभाकर बाबू रहाटे, विजय रहाटे, अनिल रहाटे, सुहास रहाटे, प्रकाश रहाटे, सुरेश रहाटे, संदीप रहाटे, प्रशांत रहाटे, राकेश राऊत, स्वप्निल राऊत, संतोष राऊत दत्तात्रय झगडे, मधूकर पवार आदी तेली बांधव व महिला उपस्थित होत्या.