जागतिक ग्राहक दिन साजरा
गुहागर : जागतिक ग्राहक दिननिमित्त शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष यांच्यावतीने तालुक्यातील रेशन दुकानात धान्य घेणाऱ्या ग्राहकांच्या तक्रारी जाणून घेण्यात आल्या व त्याचे निरसन करण्यात आले.
तालुक्यातील असगोली , बाग, वेलदुर, नवानगर, अडूर, वेळणेश्वर, कोतलुक इत्यादी रेशन दुकानावर पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधून ग्राहकांचे समाधान केले. यावेळी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष गुहागरचे पक्षप्रमुख विश्वनाथ रहाटे, गुहागर शहर प्रमुख जयश्री रायकर, प्राजक्ता जांभरकर, समीर पावसकर , रवींद्र पोळेकर, यशवंत कावणकर, विजय वाघवटे, जय गणेश, शंकर पाटील, संजय कदम, आदेश मोरे, गजानन पवार, सुरेंद्र रायकर आदी सदस्यांनी सहभाग घेतला.
यावेळी ग्राहकांच्या असलेल्या तक्रारींचे चर्चा विनिमय करण्यात आले. ग्राहकांच्या न्याय हक्काची जाणीव रेशन दुकानदार यांना करून देण्यात आली. यावेळी ग्राहकांनी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष गुहागरच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करून ग्राहकांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी असाच लढा द्यावा, अशी विनंती केली.