गुहागर तालुक्यात पदाधिकाऱ्यांचा झंझावात दौरा
गुहागर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील दरडग्रस्त आणि चिपळूण येथील पूरग्रस्त पहाणी दौरा करून या बांधवांना मदतीचा हात दिला. त्यानंतर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना केलेल्या मार्गदर्शनामुळे प्रत्येक तालुक्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे. गुहागर तालुक्यात प्रमुख पदाधिकारी यांनी प्रत्येक गावात जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन पक्ष संघटना बांधणीवर जोर दिला आहे.
National President Deepakbhau Nikalje gave a helping hand to the victims by visiting the flood affected areas of Khed and Chiplun in Ratnagiri district.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखला जात असल्याने आणि राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांचे नेतृत्वाखालील गतिमान होत असल्याने प्रत्येक गावात पक्षाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या दौऱ्यामध्ये गावातील विकासकामांबरोबर सामाजिक विषयांवर चर्चा केली जात आहे. काही लोकप्रतिनिधी फक्त निवडणूक आल्या की, मतदारांच्या दारात जातात. परंतु आमची बांधिलकी ही सर्वसामान्य जनतेशी असल्याने आम्ही सर्वांचे सुख दुःख जाणुन घेऊन समाजकारण आणि गरजे पुरत राजकारण करणार आहोत, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुरेश सावंत यांनी सांगितले.
या दौऱ्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष वैभव गमरे, युवा अध्यक्ष पराग सावंत, पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच ऊमेश कदम, सचिन कदम, रुपेश सावंत, विलास जाधव, सरचिटणीस उदय जाधव व प्रत्येक गटातील प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.