संगम मोरे : शहर भाजपने घेतला महामार्ग कामाचा आढावा
गुहागर, ता. 12 : नगरपंचायतीला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला मोठे संरक्षक पाईप टाकावेत. (Repairs required in new pipeline) अशी मागणी गुहागर शहर भाजपतर्फे महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात येणार आहे. आज गुहागर शहरातील भाजप नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी नगरपंचातय क्षेत्रातील महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर ही माहिती भाजप शहराध्यक्ष संगम मोरे यांनी दिली.


गुहागर नगरपंचायत क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे काम सध्या विजापूर महामार्गाच्या ठेकेदारामार्फत सुरु आहे. या कामासह महामार्गाच्या कामाची पहाणी आज शहर भाजपचे पदाधिकारी आणि नगरसेवक यांनी एकत्रितपणे घेतली. यासंदर्भात गुहागर न्यूजशी बोलताना संगम मोरे म्हणाले की, महामार्गाखालून जलवाहिनी जाणार आहे. त्याठिकाणी ९ इंचाच्या जलवाहीनीवर केवळ 12 ते 15 इंचाचा संरक्षक पाईप टाकण्याचे काम ठेकेदार करत आहे. आम्ही ठेकेदाराला आग्रह धरला आहे की, भविष्यातील कामाचा विचार करता या ठिकाणी मोठे सरंक्षक पाईप टाकण्यात यावेत. Repairs required in new pipeline जेणेकरुन भविष्यात सदर जलवाहिनीची देखभाल करायची असल्याच नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना मोठ्या पाईपमध्ये जावून देखभाल करणे सोपे होईल. त्याचप्रमाणे भविष्यात यापेक्षा मोठी जलवाहिनी टाकायची झाल्यास महामार्गाची तोडफोड करता याच संरक्षक पाईपमधुन जलवाहिनी टाकता येईल. आज महामार्गावरील मोऱ्या बदलताना अनेक जुने पाईप काढण्यात आले आहेत. या जुन्या पाईपचा वापर संरक्षणासाठी केला तरी चालणार आहे. ठेकेदाराला स्वतंत्र खर्च करण्याची आवश्यकता नाही. आमची मागणी ठेकेदाराच्या पर्यवेक्षकांना सांगितली आहे. शिवाय महामार्गा प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनाही आम्ही यासंदर्भात पत्र देणार आहोत. Repairs required in new pipeline
महामार्गाच्या कामाची पहाणी करतेवेळी भाजपचे गटनेते उमेश भोसले, नगरसेवक समिर घाणेकर, नगरसेविका सौ. भाग्यलक्ष्मी कानडे, शहराध्यक्ष संगम मोरे, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष नेहा वराडकर, भाजयुमोचे शहराध्यक्ष मंदार पालशेतकर, ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या ज्योती परचुरे आदी उपस्थित होते.
नगरपंचायतीचे भविष्याचा विचार करावा
महामार्गाच्या ठेकेदाराला गुहागरच्या विकासाची चिंता नाही. त्याला फक्त काम संपवायचे आहे. आधी माहिती देवून देखील दोन वेळा जलवाहिन्या तोडणाऱ्या ठेकेदाराच्या कामावर नगरपंचायतीने लक्ष ठेवायला हवे. भविष्याची तरतूद आज केली तर 5 -10 वर्षांनी पुन्हा जलवाहिन्यासाठी रस्त्या तोडण्याची वेळ येणार नाही. Repairs required in new pipeline काम लवकर होण्याबरोबरच ते योग्य पध्दतीने व्हावे याकडे नगरपंचायतीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जलवाहिनीच्या कामाची पहाणी करुन नगराध्यक्ष, पाणी समितीचे लक्ष वेधण्याचे काम भाजपने केले आहे.
– उमेश भोसले, भाजप गटनेता, गुहागर नगरपंचायत