सार्वजनिक बांधकाम उपविभागाला मनसेचे निवेदन
गुहागर : गुहागर तालुक्यातील कौंढर काळसूर येथील नदीचे पाणी दरवर्षी पुलावरुन वाहत असते. या पुलाची दुरुस्ती व पुलाखालील कचरा व गटारे साफ करण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम उप विभागाच्या उपअभियंता श्रीमती सलोनी निकम यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
The river water at Kaundhar Kalsur in Guhagar taluka flows from the bridge every year. A statement on behalf of Maharashtra Navnirman Sena was given to Mrs. Saloni Nikam, Deputy Engineer, Public Works Department regarding repair of this bridge and cleaning of garbage and gutters under the bridge.
या निवेदनात म्हटले आहे की, झोंबडी गुरववाडीच्या मार्गावरील कौंढर काळसुर येथील पुलावरून नदीचे मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असते. याच पाण्यातून नागरिक व वाहनचालक ये-जा करीत असतात. पावसाळ्यात या पुलावरून पाणी जात असल्याने अतिशय जीवघेणा प्रवास करावा लागतो. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पुलाखालील कचरा तसेच गटारे साफ करावी. या पुलाच्या दुरुस्तीचे काम वेळीच करावे जेणे करून या पुलावरून पाणी जाणार नाही यासंदर्भात योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना उपअभियंता निकम यांनी सांगितले की, सदरचा पूल विशेष दुरुस्ती क गट मधून मंजूर असून सध्या पुलाखालील कचरा तसेच गटारे साफ करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू करणार आहोत. ते काम काही दिवसात पूर्ण होईल असे सांगीतले. यावेळी मनसेचे गुहागर तालुकाध्यक्ष विनोद जानवलकर, माजी तालुकाध्यक्ष राजेश शेटे, तेजस पोकळे, दिनेश निवाते, वैभवी जानवळकर, कौस्तुभ कोपरकर, वनिता निवाते ,ऋतिक गावणकर ,रुपेश घवाळे,रोहित खांबे, शैलेश खांबे, विलास खांबे, सानिका मेटकर, नितीन खांबे, अजित पोकळे उपस्थित होते.