Renovation of toilet and waiting room by RGPPL
गुहागर, ता. 13 : रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पाद्वारे धोपावे फेरीबोट येथे प्रवाशांसाठी स्वच्छतागृह आणि प्रतिक्षालयाचे नुतनीकरण (Renovation of toilet and waiting room by RGPPL) करण्यात आले. त्यांचे उद्घाटन राष्ट्रीय युवा दिनाचे निमित्ताने करण्यात आले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केलेल्या या कामांमुळे स्थानिकांना रोजगार आणि प्रवाशांना सुविधा मिळाल्या आहेत. असे प्रतिपादन प्रतिक्षालयाच्या उद्घाटनाचे वेळी आरजीपीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO Asimkumar Samanta) असीमकुमार सामंता यांनी केले.
गुहागरमधील पर्यटन (Tourism) विकासामध्ये दाभोळ धोपावे फेरीबोट हा महत्त्वाचा टप्पा आहे. मुंबई पुण्याहून येणारे अनेक पर्यटक या फेरीबोटीचा वापर करतात. जनसुविधा अंतर्गत मेरीटाईम बोर्डाने 10 वर्षांपूर्वी धोपावे फेरीबोट थांबा येथे स्वच्छतागृह बांधले होते. मात्र त्याची दुरावस्था झाली होती. त्यामुळे विशेष करुन महिला वर्गाची मोठी कुचबंणा होत होती. हे लक्षात घेवून धोपावे फेरीबोट जवळील स्वच्छतागृहाचे नुतनीकरण (Renovation of toilet and waiting room by RGPPL) करण्याचा निर्णय आरजीपीपीएलने घेतला. आरजीपीपीएलच्या सेवा स्वास्थ केंद्राचे (Seva Wellness Centre) मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. युवराज इंजे यांच्या नेतृत्त्वाखाली स्थापत्य विभागाने हे काम केले. स्वच्छतागृहात पाण्याची टाकी व सौर उर्जवर चालणारे दिवे बसविण्यात आले. सांडपाण्याचे पाईप, शौचालयातील भांडी, वॉश बेसीन बदलण्यात आली. नुतनीकरणानंतर मेरीटाईम बोर्डाकडे स्वच्छतागृहाचे हस्तांतरण करण्यात आले. पैसे द्या आणि वापरा हा तत्त्वावर आता हे स्वच्छतागृह स्थानिक महिलांकडे सोपविण्यात आले आहे. त्यासाठी दोन महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे.
फेरीबोट येईपर्यंत अनेकवेळा प्रवाशांना (Tourist) अर्धा ते पाऊण तास प्रतिक्षा (Waiting Room) करावी लागते. त्यांच्यासाठी बांधलेल्या प्रतिक्षालयामध्ये भटके कुत्रे, गुरे, कावळे बसत, घाण करत. हे लक्षात घेवून कंपनीने येथील प्रतिक्षालयाचेही नुतनीकरण केले. प्राणी पक्षी येवू नयेत म्हणून दरवाज्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. प्रतिक्षालयामधील भिंतीवर स्वच्छतेचा संदेश (message of cleanliness) देणारे फलक लावण्यात आले आहेत. (Renovation of toilet and waiting room by RGPPL) .
12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने प्रतिक्षालयाचे उद्घाटन असीमकुमार सामंता यांनी केले. यावेळी डॉ. इंजे, मनुष्य संसाधन विभाग प्रमुख जॉन फिलीप, मेरीटाईम बोर्डाचे (MMB Department) महानोर, ग्रामविकास अधिकारी सौ. वारे यांच्यासह धोपावेतील ग्रामस्थ उपस्थित होते.