चिपळूण : गेले 24 तासात पुराच्या पाण्यात काढल्यानंतर चिपळूनमधील पाणी शुक्रवारी सकाळी ओसारण्यास सुरुवात झाली. दरम्यान NDRF सह नेव्ही, आर्मीची पथके दाखल झाली आहेत तर गुरुवारी रात्रीपासूनच रेस्क्यू ऑपेशनला सुरुवात झाली आहे. स्थानिक मच्छिमार आणि काही सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते या मदत कार्यात सहभागी झाले होते.
धरण क्षेत्रातील पावसामुळे गुरुवारी पहाटेपासून चिपळूणमध्ये पुरजन्य स्थिती निर्माण झाली. कधी नव्हे तो चिपळूण, खेर्डी आणि आजूबाजूच्या परिसर पाण्याने व्यापला गेला. आणि हळूहळू चिपळूणचा अन्य जगाशी संपर्क तुटत गेला. अनेक मोबाईल नेटवर्क बंद झाल्याने तिथली माहिती येणे कमी झाले. मात्र हजरो माणसे, गरोदर माता, लहान मुले पुरात अडकली होती. घरातल्या उंच छतावर चढलेल्या लोकांनी जस शक्य आहे तसे मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. अनेक चिपळूणवासीयांनी अन्न पाण्यावाचून अनेक तास काढले.
पूर परिस्थिती होणार हा अंदाज असतानाही मदत पथके खूप उशिरा चिपळूणच्या दिशेने निघाली. वाटेत अनेक नैसर्गिक अडचणी आल्या आणि NDRF 16 तासानंतर रात्री 8 च्या दरम्याने चिपळूणला पोहोचले. जितकी शक्य तितकी मदत NDRF ने केली. हेलपिंग हँड, रत्नदुर्ग मौंटेनिअर्स यांनीही रत्नागिरीतुन थेट चिपळूणला जाऊन अडचणीतील लोकांना बाहेर काढण्यास मदत केली. जयगड, दापोली, गुहागर येथून अनेक मच्छीमारी नौकांनी चिपळूणमध्ये आपल्या बोटी नेल्या.
15 बोटी उपलब्ध असून त्यापैकी 8 बोटी मार्फत बचाव कार्य सुरु आहे. सद्या चिपळूण येथे network नसल्याने फोन लागत नाहीत. Police Wireless मार्फतच संदेशवहन सुरु ठेवणेबाबत सूचीत केलेले आहे. खऱ्या अर्थाने शुक्रवार पासून मदत कार्यास वेग आला आहे. सकाळी चिपळूणमधील पावसाचा जोर ओसरला होता. गोवळकोट रस्त्यावरील पुराचे पाणी साधारण 3 फुटाने कमी झाले होते.