• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शेअर बाजाराची विक्रमी सुरुवात

by Ganesh Dhanawade
June 22, 2021
in Old News
16 0
0
शेअर बाजाराची विक्रमी सुरुवात
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अदानी समूहाच्या शेअर्सची पुन्हा झेप

मुंबई : मंगळवारी शेअर बाजाराने विक्रमी सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने ५३०१२.५२ वर पोहोचत नवी उंची गाठली आहे. तर निफ्टी १२७ अंकांनी वाढून १५,८७३ च्या वर पोहोचला. बीएसईचा ३० समभाग असलेला सेन्सेटिव्ह इंडेक्स सेन्सेक्स मंगळवारी ३१० अंकांच्या वाढीसह ५२,८८५०४  वर खुला झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीच्या आजच्या दिवसाची सुरुवात १५,८४०.५० वरुन झाली. सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी नेक्स्ट ५० मध्ये ३९५.३५ अंक, निफ्टी मिडकॅप ५० मध्ये ६७.८५ (०.९२%) गुण, निफ्टी बँक २५५.६० (०.७३%) आणि निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेसमध्ये १२3.५ (०.७५%) अंकांची वाढ झाली आहे.
काही दिवसांपूर्वी अदानी समूहाचे शेअर्स खाली आले होते. मात्र अदानी यांचे शेअर्सने पुन्हा झेप घेतली आहे. गौतम अदानीची संपत्ती काही मिनिटांत ५ अब्ज डॉलर्सने वाढली. अदानी टोटल गॅस, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये सलग दुसर्‍या दिवशी किंमतीत वाढ दिसून येत आहे. यामुळे ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांची संपत्ती काही मिनिटांत ५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढली आहे. फोर्ब्स रियल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार, जगातील अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी आता १६ व्या स्थानावर आहेत आणि त्यांची संपत्ती ६७.७ अब्ज डॉलर्स आहे.

सेन्सेक्सने गाठला उच्चांक
मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारातील प्रमुख शेअर निर्देशांक सेन्सेक्स ३५० अंकांच्या वर गेला. जागतिक शेअर बाजाराच्या सकारात्मक तुलनेत हेवीवेट रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक या समभागांच्या तेजीत तेजी दिसून आली. यादरम्यान सेन्सेक्सने आतापर्यंतच्या उच्चांक गाठला. सेन्सेक्समध्ये दोन टक्क्यांचा सर्वाधिक वाढ ही मारुतीच्या शेअर्समध्ये झाली. याशिवाय एमअ‍ॅन्डएम, एलअ‍ॅन्ड टी, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, एसबीआय आणि एचडीएफसी यांच्या शेअर्समध्ये देखील वाढ झाली आहे. मागील सत्रात सेन्सेक्स २३०.०१ अंक किंवा ०.४४ टक्क्यांनी वधारून ५२,५७४.४६  वर बंद झाला होता. त्याचप्रमाणे निफ्टी ६३.१५ अंकांनी किंवा ०.४० टक्क्यांनी वधारून १५,७४६.५० वर बंद झाली. परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) सोमवारी सकल आधारावर १,२४४.७१ कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत, असे शेअर बाजाराच्या अस्थायी आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेलाचा बेंचमार्क ब्रेंट क्रूड ०.३५ टक्क्यांनी वाढून ७५.१६ डॉलर प्रति बॅरलवर होता.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarshare marketअदानी ग्रीन एनर्जीअदानी टोटल गॅसअदानी ट्रान्समिशनअदानी पॉवरआयसीआयसीआय बँकएचडीएफसीजागतिक शेअर बाजारटॉप न्युजताज्या बातम्यानॅशनल स्टॉक एक्सचेंजमराठी बातम्यारिलायन्स इंडस्ट्रीजलोकल न्युजशेअर बाजार
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.