गुहागर भाजपतर्फे दुर्गादेवी मंदिरात कार्यक्रम
गुहागर, ता. 07 : पंजाब मध्ये घडलेल्या घटनेमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घातपात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र परमेश्र्वराच्या कृपने आणि जनतेच्या आशिर्वादांमुळे या घटनेतून देशाचे पंतप्रधान सुखरुप बाहेर पडले. या पार्श्र्वभुमीवर गुहागर तालुका भाजपने दुर्गादेवी मंदिरात महामृत्युंजय मंत्राचे पठण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिर्घायुष्य लाभावे म्हणून दुर्गामातेकडे आशिर्वाद मागितले आहेत. Recitation of Mahamrityunjaya for PM Modi
भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि श्री दुर्गादेवी देवस्थानचे अध्यक्ष यांच्या पुढाकाराने महामृत्यंजय मंत्र पठणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. Recitation of Mahamrityunjaya for PM Modi भाजयुमोचे तालुकाध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक संजय मालप यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक महाजन, कोळथरे हे देखील उपस्थित होते.
दुर्गाश्री वेदपाठशाळाचे अध्यापक वेदमूर्ती योगेश सोहनी यांच्या उपस्थितीत वेदाध्ययन करणाऱ्या मुलांनी महामृत्युंजय मंत्राचे पठण केले. त्यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मंदिरात उपस्थित होते. पठण झाल्यानंतर श्री दुर्गादेवी मंदिरात आरती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिर्घायुष्य मिळो अशी प्रार्थना करण्यात आली. Recitation of Mahamrityunjaya for PM Modi
यावेळी गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नीलेश सूर्वे, तालुका सरचिटणीस सचिन ओक, नगरपंचायत गटनेते उमेश भोसले, तालुका सरचिटणीस ज्योतीताई परचुरे, शहराध्यक्ष संगम मोरे, नगरसेविका मृणालताई गोयथळे, भाग्यलक्ष्मी कानडे, नगरसेवक संजय मालप आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. Recitation of Mahamrityunjaya for PM Modi