जयवंत जालगावकर : हवामान बदलावर चर्चासत्र आवश्यक
गुहागर, ता. 29 : सातत्याने बदलणारे हवामान आणि त्याचे परिणाम (Socio-economic and environmental effects of climate change in the Indian subcontinent) याबाबत देशपातळीवर चर्चा होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने खरे ढेरे भोसले महाविद्यालयाने राष्ट्रीय चर्चासत्राचा चांगला उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला मदत म्हणून रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने 50 हजार रुपयांचे आर्थिक साह्य केले आहे. अशी माहिती बँकेचे संचालक जयवंत जालगांवकर यांनी दिली. RDCC Bank helps KDB College
RDCC Bank helps KDB College
खरे ढेरे भोसले महाविद्यालयाद्वारे ‘भारतीय उपखंडातील हवामान बदलाचे सामाजिक आर्थिक व पर्यावरणीय परिणाम’ (Socio-economic and environmental effects of climate change in the Indian subcontinent) या विषयावर राष्ट्रीय परिषद भरविण्यात येणार आहे. या परिषदेसाठी देशभरातील विविध पर्यावरण तज्ञ, अर्थतज्ञ, कृषीतज्ञ (Environmentalists, economists, agriculturists) यांच्याशी महाविद्यालयाची बोलणी सुरु आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी देशभरातील या विषयाचे अभ्यासक, जाणकार तसेच मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये यांच्याशी संपर्क साधण्याचे काम सुरु आहे. एवढ्या मोठ्या कार्यकक्षेत्रामध्ये आणि शेकडो मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होण्याऱ्या राष्ट्रीय चर्चासत्रासाठी तंत्रज्ञानाची जोड ही आवश्यक आहे. त्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी परवाने घेणे गरजेचे ठरते. या सर्व गोष्टीसाठी महाविद्यालयाला निधीची गरज होती. विषयाचे महत्त्व लक्षात घेवून रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने महाविद्यालयाचा प्रस्ताव स्विकारला. बँकेचे संचालक जयवंत जालगांवकर आणि डॉ. अनिल जोशी यांनी महाविद्यालयाला रु. 50 हजाराचा धनादेश दिला आहे. त्याबद्दल रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्राचार्य सावंत यांनी आभार मानले आहेत. RDCC Bank helps KDB College