रत्नागिरी : येथील सुप्रसिद्ध लेखिका स्मिता शरद राजवाडे(Author Smita Sharad Rajwade) (वय ७३) यांचे काल (दि. १८ जानेवारी) रात्री ८ वाजता मंगळूर (कर्नाटक) येथे निधन झाले. कोकण मराठी कोशासह मराठी, हिंदी, उर्दूमध्ये विविधांगी लेखन, कविता, कादंबरी, ललित, लिखाण करणाऱ्या साहित्यिक म्हणून त्या राज्य भर प्रसिद्ध होत्या. ( Ratnagiri writer Smita Rajwade passes away)
श्रीमती राजवाडे यांचा जन्म ३० जानेवारी १९४८ रोजी झाला. त्यांच्या पतीचे २००५ साली निधन झाले. श्रीमती राजवाडे यांनी हिंदी आणि मराठी या दोन विषयांत प्रथम श्रेणीतून एमए पदवी(MA degree) संपादन केली. राष्ट्रभाषा पंडित, साहित्य विशारद या परीक्षाही त्या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमधील साहित्याचा त्यांचा गाढा व्यासंग होता. स्वा. सावरकर, कुसुमाग्रज , संत कबीर यांच्यावर त्यांनी विपुल लेखन केले. रामचरितमानस या संपूर्ण काव्याचा त्यांनी मराठीत अनुवाद केला. त्या उर्दू भाषाही शिकल्या. त्यातून त्यांनी उर्दू साहित्याचा अभ्यास केला.उर्दू काव्यरचनाही केल्या. कादंबरी, कथा, ललित, काव्यसंग्रह, अनुवादित कवितासंग्रह, बालसाहित्य, नाटक अशी त्यांची १७ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. कोकण मराठी कोशामध्ये त्यांनी लेखन केले आहे. स्त्रीजीवन(Feminine life), संतसाहित्यावरील(Saint literature) लेखनाचा त्यात समावेश आहे. गुण गुण गाणी या त्यांच्या बालसाहित्यसंग्रहाला पुण्याच्या साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा(Sahityapremi Bhagini Mandal) पुरस्कार मिळाला. शीघ्रकाव्य हेही त्यांच्या साहित्यप्रतिभेचे वैशिष्ट्य होते.( Ratnagiri writer Smita Rajwade passes away)
रत्नागिरीत आकाशवाणीचे केंद्र(Radio station) सुरू झाल्यानंतर त्यांनी विविध कार्यक्रम त्या केंद्रावर सादर केले. त्या आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कवयित्री(Poetess) होत्या. त्यांना ए ग्रेड कलाकार(A grade artist) म्हणून मान्यता मिळाली होती. श्रीमती राजवाडे यांनी रत्नागिरीत पटवर्धन हायस्कूल(Patwardhan High School) आणि फाटक प्रशालेत(Fatak School) काही काळ अध्यापन(Teaching) केले. रत्नागिरीच्या स्वातंत्र्यलक्ष्मी चौकातील (Swatantryalakshmi Chowk) जनसेवा ग्रंथालयासाठी(Public Service Library) त्यांनी अनेक उपक्रम राबविले. त्यांना स्वाती, साक्षी आणि गौरी अशा तीन विवाहित कन्या आहेत. गेली दोन वर्षे त्या मंगळूर येथील कन्या साक्षी अभिजित शिवलकर यांच्याकडे राहायला गेल्या होत्या. तेथेच त्यांचे काल हृदयविकाराच्या झटक्याने(Heart attack) निधन झाले.( Ratnagiri writer Smita Rajwade passes away)