गुहागर : ऑर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ ह्युमन महाराष्ट्रच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर दि. 2 ऑक्टोबरपासून सुरू केलेल्या साखळी उपोषणाचा आजच्या सातव्या दिवशी ठाणे व कल्याणच्या कर्मचा-यांनी उपोषण केले असून उद्या दि. 10 रोजी आफ्रोहचे राज्य कार्यकारिणी सदस्य व प्रसिद्धी प्रमुख तथा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर यांच्या सह रत्नागिरी आफ्रोहचे सचिव बापुराव रोडे, सभासद किशोर रोडे, गजानन उमरेडकर हे आझाद मैदान, मुंबई येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणात सहभागी होणार आहेत.
On behalf of Organization for Rights of Human Maharashtra, for various demands of retired employees, tomorrow. On the 10th, Afroh’s state executive member and head of publicity and Ratnagiri district president Gajendra Paunikar along with other members will participate in the chain fast.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्हातील सेवानिवृत्त कर्मचारी आझाद मैदानावर साखळी उपोषणासाठी उपस्थित राहून शासनाकडून सेवानिवृत्त कर्मचा-यांसाठी न्याय मिळण्यासाठी मागणी करत आहेत. गेल्या दोन वर्षापासून या सेवानिवृत्त कर्मचा-यांना पेन्शन सुरू न झाल्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी संकटात सापडलेले आहेत.
या साखळी उपोषणात आता सेवानिवृत्त कर्मचा-यांबरोबरच सेवेत असलेल्या कर्मचारीही उपोषणासाठी सरसावले आहेत. आजच्या उपोषणाच्या सातव्या दिवशी कल्याण येथील श्रीमती मालती मोहाडीकर, चंद्रकला रंभाड, परेल येथील शिला गोस्वामी व ठाणे येथील उमाकांत वाकोडीकर हे चौघे उपोषणाला बसले होते. साखळी उपोषणासाठी ठाणे जिल्हाशाखेचे अध्यक्ष दयानंद कोळी, महिला आघाडीच्या सौ. प्रियाताई खापरे, राज्य कार्यकारिणी सदस्य नरेश खापरे उपाध्यक्ष अर्जून मेस्त्री, कोषाध्यक्ष नरेंद्र भिवापूरकर, सचिव घनश्याम हेडाऊ, श्रीमती स्मिता भोईर, श्री पांडुरंग नंदनवार, श्री प्रकाश कोळी व इतर पदाधिकारी यासाठी प्रयत्नशिल आहेत.