• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आझाद मैदानावरील आंदोलनातही रत्नागिरी ‘आफ्रोह’ने उठवला ठसा !

by Ganesh Dhanawade
December 31, 2021
in Guhagar
17 0
1
आझाद मैदानावरील आंदोलनातही रत्नागिरी ‘आफ्रोह’ने उठवला ठसा !
34
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : ऑर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ ह्युमन, महाराष्ट्रच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या विविध  मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आफ्रोहच्या विविध आंदोलनात ठसा उमटवलेल्या रत्नागिरी आफ्रोहच्या 23 कर्मचा-यांनी याही आंदोलनात उत्सफूर्तपणे सहभाग घेवून आपला ठसा उमटवला.
Organization for Rights of Human, Maharashtra for various demands of retired employees Afroh’s various movements on the Azad Maidan in Mumbai 23 employees of Ratnagiri Afroh made their mark by spontaneously participating in this agitation.

आझाद मैदानावर केलेल्या 67 दिवसाच्या ऐतिहासिक साखळी उपोषणानंतरही न्याय न मिळाल्याने आफ्रोहने हिवाळी अधिवेशनादरम्यान वेगळे व हटके आंदोलनाची भूमिका घेतली. आफ्रोहच्या वेगवेगळया जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना या आंदोलनासाठी आझाद मैदानावर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार  पुणे, सातारा, वाशिम, ठाणे, सिंधुदूर्ग जिल्ह्यासह आंदोलनाच्या दुस-या दिवशी अर्धनग्न आंदोलनासाठी रत्नागिरी आफ्रोहची टीम आझाद मैदानावर दाखल झाली होती.  व या आंदोलनादरम्यान राज्य  कार्यकारीणी सदस्य व प्रसिद्धी प्रमुख गजेंद्र पौनीकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष माधुरी घावट, उपाध्यक्ष उषा पारशे, सचिव माधुरी मेनकार, विलास देशमुख, पंढरीनाथ पुप्पलवार यांनी आपल्या मनोगतातून आफ्रोहच्या मागण्यांची व सेवानिवृत्त कर्मचा-यांना पेन्शन देण्याची जोरदार मागणी केली. तर गजेंद्र पौनीकर यांनी जात पडताळणी समितीच्या भ्रष्ट व मनमानी कारभारावर ताशेरे ओढले.
आझाद मैदानावरील या आंदोलनात गजेंद्र पौनीकर यांच्यासह सचिव बापुराव रोडे, कोषाध्यक्ष किशोर रोडे, हेमराज सोनकुसरे, सतीश घावट, गजानन उमरेडकर, सुरेखा घावट, राजेश कुंभारे, श्रीकृष्ण भांडे, प्रवीण सनगाळे, सुनंदाव देशमुख, दिलीप कडू, विश्वास फुकट, रामदास फुकट, बळीराम भगत,बंडू चेचरे यांनी भाग घेतला.

Tags: AfrohagitationAzad MaidanemployeesGuhagarGuhagar NewsMarathi NewsMumbaiNews in GuhagarparticipatingRatnagiri Afrohspontaneouslyvarious demandsआझाद मैदानआंदोलनआफ्रोहऑर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ ह्युमनटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यारत्नागिरीलोकल न्युजहिवाळी अधिवेशन
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.