रांगोळी व मेहेंदी स्पर्धा : खरे ढेरे भोसले महाविद्यालयाचे आयोजन
गुहागर, ता. 17 : खरे ढेरे भोसले उच्च महाविद्यालयाने आयोजीत केलेल्या रांगोळी स्पर्धेत सानिका मोरेने तर मेहंदी स्पर्धेत इरम इरफान शहाफकीर या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक पटकावला. राजमाता जिजाऊ व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती या दोन्ही जयंतीच्या निमित्ताने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. Rangoli and Mehndi Competition


महाविद्यालयातील आजीवन शिक्षण आणि विस्तार विभाग, महिला विकास कक्ष व सांस्कृतिक विभागामार्फत ऑनलाइन पद्धतीने या स्पर्धा घेण्यात आल्या. रांगोळी स्पर्धेसाठी लेक-वाचवा, लेक-शिकवा, कोरोना जनजागृती, प्राणी वाचवा, जैव विविधता, वेळेचे नियोजन, व्यसनाधिनता, जल साक्षकरता, राष्ट्रीय एकात्मता असे विषय देण्यात आले होते. तर मेहेंदी स्पर्धेमध्ये अरेबिक, भारतीय पद्धतीची मेहेंदी हे विषय होते. दोन्ही स्पर्धेत 50 विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या. Rangoli and Mehndi Competition रांगोळी स्पर्धेत सानिका शैलेश मोरे, (प्रथम), क्षितीज राजेंद्र गायकवाड (द्वितीय) आणि निधी गोपाळ पुजारी (तृतिय) या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. तर मेहंदी स्पर्धेत इरम इरफान शहाफकीर, प्राजक्ता मोहिते, आकांक्षा कुरधुंडकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला. सर्व विद्यार्थींनींनी आपल्या कलेचे फोटो सामाजिक माध्यमावर प्रसारीत करुन जनजागृती केली. Rangoli and Mehndi Competition
या स्पर्धेचे आयोजन प्रा.आगळे, प्रा.सौ.रश्मी आडेकर व प्रा.डॉ.बाळासाहेब लबडे, प्रभारी प्राचार्य डॉ.अनिल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली केले. यशस्वी विद्यार्थांचे प्रभारी प्राचार्य डॉ.अनिल सावंत यांनी अभिनंदन केले आहे. Rangoli and Mehndi Competition