• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मुंबईत खेळण्यांच्या दुकानांवर छापा

by Mayuresh Patnakar
January 17, 2022
in Maharashtra
17 0
0
Raid on toy shops in Mumbai

Raid on toy shops in Mumbai

33
SHARES
93
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

भारतीय मानक ब्यूरोची कारवाई

मुंबई : भारतीय मानक ब्यूरोच्या मुंबई शाखेतील अधिकाऱ्यांच्या पथकाने, शनिवारी (15 जानेवारी 2022) मुंबईतील गोरेगाव भागातल्या ओबेरॉय मॉलमधल्या मेसर्स हैमलेज (मेसर्स रिलायन्स ब्रॅंडस लिमिटेड)  या दुकानावर छापे टाकला. या दुकानात, इलेक्ट्रिक आणि बिगर-इलेक्ट्रिक खेळण्यांची प्रमाणित चिन्हाविना (BIS Standard Mark) विक्री सुरु होती. हे केंद्र सरकारने खेळण्यांच्या दर्जाबाबत जारी केलेल्या गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे उल्लंघन असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी अनेक अप्रमाणित खेळणी देखील जप्त करण्यात आली. Raid on toy shops in Mumbai

मुलांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने गेल्यावर्षी अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार, 1 जानेवारी 2021 नंतर भारतात विकल्या जाणाऱ्या सर्व खेळण्यांवर भारतीय मानक ब्युरोचे सुरक्षिततेविषयक प्रमाणपत्र आणि मुद्रा म्हणजेच मार्क (BIS Standard Mark) असणे अनिवार्य आहे. Raid on toy shops in Mumbai

केंद्र सरकारने जारी केलेल्या गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे उल्लंघन केल्यास, बीआयएस कायदा 2016 कायद्यानुसार,  तो दंडनीय अपराध असून, त्यासाठी दोन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास किंवा किमान 2 लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्हीची तरतूद आहे. त्यामुळे खेळणी उत्पादक, वितरक आणि व्यापारी यांनी, बीआयएसने प्रमाणित न केलेली खेळणी बनवू अथवा विकू नयेत. ग्राहकांनीही, प्रमाणित उत्पादक तसेच उत्पादनांची माहिती मिळवण्यासाठी, बीआयएस केअर अॅपचा वापर करावा. असे आवाहन मानक ब्यूरोच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. Raid on toy shops in Mumbai

काय आहे BIS Care App

भारतीय मानक ब्युरोने ग्राहकांना बीआयएस मार्क असलेली खेळणी समजावीत यासाठी एक ॲपलिकेशन तयार केले आहे. हे ॲपलिकेशन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. पीसी, लॅपटॉप, ॲन्ड्राईड फोन, आय फोन यांच्यासाठी स्वतंत्र ॲप उपलब्ध आहेत. ही ॲप आपण डाऊन लोड करु शकतो. या ॲपलिकेशनमध्ये असलेल्या स्कॅनरवर क्युआर कोड स्कॅन केल्यावर सदर वस्तू बीआयएस मानांकित आहे की याची माहिती आपल्याला समजू शकते.

Tags: BIS Standard MarkBreaking NewsGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsLocal NewsMarathi NewsNews in GuhagarRaid on toy shops in MumbaiTop newsगुहागर न्यूजगुहागरच्या बातम्याताज्या बातम्यामराठी बातम्यास्थानिक बातम्या
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.