गुहागर : लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर संस्थेचा कार्य अहवाल पुस्तक प्रकाशन सोहळा कार्याध्यक्ष साहिल आरेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार श्री. शेखर निकम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. शेखर निकम साहिल आरेकर व त्याच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.
गुहागरचे माजी सभापती स्व.सदानंद आरेकर साहेब यांच्या शतक महोत्सवी जयंती वर्षानिमित्त लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून गुहागर तालुक्यातील विविध जाती धर्मातील तरुणांना संघटित करून साहिल आरेकर यांनी गेली ३ ते ४ वर्षे सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक अश्या विविध क्षेत्रात काम केले असून त्या सर्व कामाचा आलेख आज या आम्ही चालवु हा सदा वारसा या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवण्यात आला आहे.यावेळी साहित्य परिषद शाखा गुहागर अध्यक्ष राजेंद्र आरेकर, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष साहिल आरेकर, महिला विभाग प्रमुख सौ.स्वातीताई कचरेकर, श्री.रोहित खातू, सौ.सिद्धी आरेकर, श्री.मंदार कचरेकर, सौ.सुप्रिया पारकर, श्री.अभिषेक भोसले, कु.शिवाली आरेकर, श्री. सूरज चव्हाण, श्री. अनिकेत गायकवाड, नगरसेवक श्री.अविनाश केळस्कर, श्री. अक्षय केदारी, श्री. हनिफशेठ हरचिरकर, श्री.अमित सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.