आफ्रोहच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव
गुहागर : अधिवेशन प्रसंगी आझाद मैदान मुंबई येथे दि. २२ डिसेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘हलबा एल्गार मोर्चा’ला ऑर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ ह्युमन च्या रत्नागिरी शाखेने पाठिंबा दिल्याचे ऑफ्रोहचे राज्य कार्यकारिणी सदस्य व प्रसिद्धीप्रमुख गजेंद्र पौनीकर यांनी जाहीर केले. नुकताच श्रावस्ती नगर, नाचणे रोडे रत्नागिरी येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आफ्रोहच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात येवून सर्वानुमते ठरावही पारीत करण्यात आला.
On the occasion of the convention at Azad Maidan, Mumbai. Held on December 22, 2021 ‘Halba Elgar Morcha’ by Ratnagiri Branch of Organization for Rights of Human Afroh’s state executive member and head of publicity Gajendra Paunikar announced his support.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष अरूण बावीस्कर, आफ्रोहचे सचिव बापुराव रोडे, कोषाध्यक्ष किशोर रोडे, आफ्रोह महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ.माधुरी घावट, उपाध्यक्ष सौ.उषा पारशे, सचिव श्रीमती माधुरी मेनकार ह्या उपस्थित होत्या. ३३ अन्यायग्रस्त जमातीमधील हलबा ही एक जमात असून अधिसंख्य सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेंशन व इतर सेवानिवृत्ती नंतरचे लाभ मिळावे, व इतर मागण्या ह्या ‘हलबा एलगार मोर्चा’च्या आयोजकांनी शासनास केली आहे. मोर्च्यातील मागणी आफ्रोह संघटनेच्या मागणीला समांतर आहे. त्यामुळे सर्वानुमते दि.२२डिसेंबरच्या हलबा एल्गार मोर्च्यास पाठिबा देण्याचे सभेत सर्वानुमते ठरविण्यात आले .
प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष आफ्रोहचे जेष्ठ सदस्य अरूण बावीस्कर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून सर्वसाधारण सभेचे उद्घाटन करण्यात आले. आफ्रोहचे प्रसिद्धीप्रमुख गजेद्र पौनीकर यांच्या हस्ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला तर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ. माधुरी घावट यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करण्यात आला. व्यासपीठावरील मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. प्रसिद्धीप्रमुख गजेंद्र पौनीकर यांनी 2 फेब्रुवारी 2020 रोजीच्या स्थापनेपासून आफ्रोह राज्य संघटनेने संविधानिक पद्धतीने वेळोवेळी शासनाशी केलेला पत्रव्यवहार, लेखी निवेदने देवून पाठपुरावा केल्याचे, कायद्याची भक्कम बाजू शासनाकडे व लोकप्रतिनिधींकडे मांडल्याचे सपुरावे सादर केले. राज्यभर विविध आंदोलनाच्या माध्यमातून सेवासमाप्त कर्मचा-यांना न्याय मिळवून दिल्याचेही त्यांनी सांगितले. यामध्ये रत्नागिरी जिल्हा आफ्रोह व महिला आघाडीने घेतलेला उत्सफूर्त सहभाग घेतल्याचे विवेचनही प्रसिद्धीप्रमुख गजेंद्र पौनीकर यांनी केले. तसेच जिल्हा परिषदेने काढलेल्या अन्यायकारक आदेशाविरूदध जिल्हा परिषद व शासनस्तरावर केलेल्या पाठपुराव्यामुळे यश प्राप्त केल्याचेही श्री. पौनीकर यांनी यावेळी सभेपुढे मांडले.
सचिव बापुराव रोडे यांनी सन 2020-21 व नोव्हेंबर 2021 पर्यत आफ्रोहचा जमाखर्चाचा आढावा सादर केला. कोषाध्यक्ष किशोर रोडे यांनी मुंबईतील ‘हलबा एल्गार मोर्चा’ तसेच आफ्रोहचे ‘अर्धनग्न आंदोलनात’ सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन महिला आघाडीच्या सचिव माधुरी मेनकार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर रोडे,बापुराव रोडे, उषा पारशे, राजेश सनगळे, हेमराज सोनकुसरे,विलास घावट, विलास देशमुख,बंडू चेचरे, मंगला रोडे,प्रतिभा रोडे, सुनंदा व निकिता देशमुख यांनी परिश्रम घेतले.