आरजीपीपीएल व्यवस्थापनाला इशारा
गुहागर : एन्रॉनचा दिवाळखोरीत गेलेला बहुचर्चित दाभोळ पॉवर वीज प्रकल्प आणि सद्याचा रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रा. लि. कंपनी ही अंजनवेल, वेलदूर व रानवी या तीन गावांच्या हद्दीमध्ये उभारण्यात आली आहे. दरम्यान, या तिन्ही गावातील ग्रामपंचायतींना दरवर्षी इमारत व जमीन कर दिला जात होता. मात्र गेल्या येथील व्यवस्थापनाने सदरील इमारत व जमीन कर सन २०२१-२०२२ पासून न देण्याचा निर्णय ग्रामपंचायतींना कळविला आहे. सदरील कर ग्रामपंचायतींना मिळावा अन्यथा कंपनी विरोधात आंदोलन सुरु करण्यात येईल, असा इशारा अंजनवेल – वेलदूर – रानवी प्रकल्पग्रस्त समितीच्यावतीने कंपनी प्रशासनाला देण्यात आला आहे
Enron’s bankrupt Dabhol Power Plant and the current Ratnagiri Gas and Power Pvt. Ltd. The company is set up within the boundaries of three villages, Anjanvel, Veldur and Ranvi Has been erected. Meanwhile, the gram panchayats of these three villages were being paid building and land tax every year.
गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रुप ग्रामपंचायत अंजनवेल, निर्मल ग्रुप ग्रामपंचायत वेलदूर व निर्मल ग्रामपंचायत रानवी या तीने ग्रामपंचायतींना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ प्रमाणे दरवर्षी दिला जाणारा इमारत व जमीन कर सन २०२१-२०२२ पासून न देण्याचा निर्णय सदर ग्रामपंचायतींना कळविला आहे. इमारत व जमीन कर मिळणे हा सदर ग्रामपंचायतींचा कायदेशीर हक्क आहे. तो आपण नाकारल्यामुळे सदर ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील विकासकामावर भयंकर वाईट परिणाम होणार आहेत. तसेच ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात सुरु असलेले जनतेच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे उपक्रम बंद पडणार आहेत. याबाबत यापुर्वी या दोन गावातील माजी सरपंच यशवंत बाईत, माजी सरपंच आत्माराम मोरे व माजी सरपंच विठ्ठल भालेकर यांनी अनेकवेळा पत्र पाठवून ग्रामपंचायतींना इमारत व जमीन कर देण्यास विनंती केली आहे. परंतु त्या पत्रावर काहीच प्रतिसाद दिलेला नाही.
तसेच रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रा. लि. प्रकल्पात कामावर असलेल्या संघटीत व असंघटीत कामगारांचे अनेक न्याय प्रश्न आपल्या कंपनीकड्न सोडविले जात नाहीत. अंजनवेल-वेललूर- रानवी गावांतील बेरोजगारांना कामावर ठेवण्यासाठी प्राधान्य दिले जात नाही. संघटीत व असंघटीत कामगारांच्या विषयांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. दरम्यान, सर्व वस्तुस्थितीचा विचार करून अंजनवेल-वेलदूर-रानवी येथील ग्रामस्थ प्रतिनिधींनी दि.१९ ऑक्टोबर रोजी बैठक घेवून अंजनवेल-वेलदूर-रानवी प्रकल्पग्रस्त समिती स्थापन केली आहे. वरील दोन्ही विषयांबाबत चर्चा करून न्याय निर्णय करण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाने समितीला आपण वेळ द्यावी अशी मागणी केली आहे. येत्या आठ दिवसात चर्चा न झाल्यास अंजनवेल-वेलदुर-रानवी गावातील लोकशाही मार्गाने प्रकल्पग्रस्त आंदोलन करतील, असा इशारा समितीचे अध्यक्षा यशवंत बाईत, उपाध्यक्ष आत्माराम मोरे, सरचिटणीस विठ्ठल भालेकर, उप सचिव भरत भुवड यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.