महर्षी परशुरामच्या विद्युत अभियांत्रिकी विभागाचा अभिनव उपक्रम
MPCOE Professors taken Experience training
गुहागर, ता. 25 : अभ्यासक्रमातील तात्विक अभ्यासाला प्रत्यक्ष प्रयोगाची जोड मिळाली की माणूस ज्ञानी होतो. याचा अनुभव महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालातील प्राध्यापकांनी (MPCOE) घेतला. या महाविद्यालयातील विद्युत विभागातील 6 जणांनी पेठे ब्रेक मोटर्स मध्ये 8 दिवस अनुभव शिक्षण घेतले. Professors taken Experience training
गुहागर तालुक्यातील मोडकाआगर येथे पेठे ब्रेक मोटर्स कंपनी आहे. या कंपनीमध्ये पाण्याच्या पंपांपासून रेल्वे, लिफ्ट आदींसाठी आवश्यक असणारे ब्रेक बनविले जातात. त्यामुळे महर्षी परशुराम महाविद्यालयाने (MPCOE) या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे सुट्टीच्या कालावधीमध्ये इच्छुक विद्यार्थ्यांना येथे काम करण्याची संधी मिळते. Professors taken Experience training
कोरोनाच्या काळात अनेकदा महाविद्यालय (MPCOE) विद्यार्थ्यांसाठी बंद होते परंतू प्राध्यापकांना उपस्थित रहावे लागत होते. अशा कालावधीत प्रत्यक्ष प्रयोगाचा अनुभव मिळावा म्हणून महाविद्यालयातील विद्युत विभागातील प्राध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक आणि अन्य कर्मचारी यांनी पेठे ब्रेक मोटर्स मध्ये अनुभव शिक्षण घेण्याचा कार्यक्रम आखला. Professors taken Experience training दिनांक ५ जानेवारी ते ८ जानेवारी २०२२ आणि १९ जानेवारी ते २२ जानेवारी या चार दिवसांच्या दोन टप्प्यात ३ फेज मोटर तयार केली. यामध्ये वायंडिंग करणे, व्हॉर्निश लावणे, वायंडिंगच्या वेटोळ्या (टर्न्स) बनविणे, रोटर लावणे, मोटार बंदिस्त करणे, 2000 व्होल्टचा वीज प्रवाह सोडून विविध चाचण्या घेणे आदी कामे केली. याशिवाय ब्रेक कसे बनतात, त्यांचे टेस्टिंग कसे केले जाते, आदी विषयांचा अनुभव. त्यामुळे हा उपक्रम विद्युत विभागासाठी कौशल्य विकसीत (Skill Development) करणारा ठरला. Professors taken Experience training
पेठे ब्रेक कंपनीचे व्यवस्थापक रवींद्र कानिटकर, उत्पादन प्रमुख दीपक काटदरे आणि विद्युत विभाग प्रमुख योगेश वराडकर यांच्यासह कंपनीतील अधिकारी, कर्मचारी यांनी कौतुकाने अभियांत्रिकीच्या विद्युत विभागातील प्राध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक, अन्य कर्मचारी यांना सहकार्य व मार्गदर्शन केले. विद्युत विभागाच्या घेतलेल्या अभिनव उपक्रमाचे (Professors taken Experience training)अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्या प्रसारक मंडळाचे संचालक आदींनी विशेष कौतुक केले आहे.
Professors taken Experience training
प्रत्यक्ष काम केल्यावर पुस्तकी ज्ञान आणि प्रत्यक्ष काम यातील अंतर सर्वांच्या लक्षात आले. अभियांत्रिकीमधील प्राध्यापक, तंत्रज्ञ शिक्षणानंतर थेट परीक्षा देवून अध्यापन क्षेत्राकडे वळतात. त्यांना औद्योगिक क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव नसतो. जर अशाप्रकारे अनुभव प्रशिक्षण घेतले तर त्याच्या अध्यापनात निश्चित सकारात्मक बदल होईल.
– प्रा. सतिश घोरपडे, विद्युत विभाग प्रमुख, महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्र्वर