सचिवपदी प्रकाश गोरे यांची निवड
गुहागर : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटना तालुका शाखा गुहागरची नूतन कार्यकारिणी नुकतीच संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे व जिल्हा सचिव संतोष मोहिते, माजी तालुकाध्यक्ष सिद्धार्थ जाधव, जिल्हा सदस्य सुरेश सुर्वे, प्रदिप जाधव यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.
यावेळी तालुकाध्यक्षपदी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक सुहास गायकवाड व सचिवपदी उपक्रमशील शिक्षक प्रकाश गोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. याचबरोबर कार्याध्यक्ष सुधीर कांबळे, कोषाध्यक्ष सुहास जाधव, सहसचिव वैभवकुमार पवार, उपाध्यक्ष भिमलेश वारके, शाम पवार, प्रदीप जाधव , ममता जाधव, सल्लागार केंद्रप्रमुख विश्वास खर्डे, प्यारेलाल मोते, रविंद्र माने, राजदत्त कदम, अमोल होवाळे, अनंत पवार, प्रदिप गमरे, राजेश मोहिते, इश्वर वसावे, जिल्हा प्रतिनिधी सिद्धार्थ जाधव, रमेश सुर्वे, महिला प्रतिनिधी प्रमोदिनी गायकवाड, मधुरा पवार, रेखा माने, स्मिता मोहिते यासह कार्यकारिणी सदस्य, बीट प्रतिनिधी, केंद्र प्रतिनिधी म्हणून इतर शिक्षकांची निवड करण्यात आली.जिल्हा सचिव संतोष मोहिते यांनी कास्ट्राईब शिक्षक संघटनेची गरज का आहे हे सविस्तरपणे विषद केले. तसेच गुहागर शाखेने आजवर अत्यंत चांगल्या प्रकारे संघटनेच्या वाढीसाठी विविध कार्यक्रम राबविल्याचे सांगितले. जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे यांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हास्तरावर संघटनेने यावर्षभरात केलेल्या कामकाजाचा आढावा सादर केला. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचा दर १ हजार रूपयांवरुन ५ हजार करण्यासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटनेने प्रयत्न केल्याचे सांगितले तसेच अपंग शिष्यवृत्ती व समाजकल्याण विभागातर्फे देण्यात येणाऱ्या सर्व शिष्यवृत्त्यांचे दरही वाढविण्यासाठी संघटना प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. इतर मागास विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती साठी उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी पालकांचे स्वयंघोषणापत्र घेण्यात यावे अशी मागणीही शासनाकडे केल्याचे त्यांनी सांगितले.तसेच माजी तालुकाध्यक्ष केंद्रप्रमुख सिद्धार्थ जाधव यांनी तालुक्यात संघटना वाढीसाठी खूप मेहनत घेतली आहे. नूतन कार्यकारिणीने हाच आदर्श समोर ठेवून संघटनेचे कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. माजी अध्यक्ष सिद्धार्थ जाधव यांनी सेवानिवृत्त झालो असलो तरीही संघटनेसाठी अविरतपणे काम करणार असल्याचे जाहीर केले. शेवटी विद्यमान सचिव प्रकाश गोरे यांनी सर्वांचे आभार मानले.