गुहागर : तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटरला गुहागरच्या नूतन तहसिलदार सौ.प्रतिभा वराळे यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी सुयश कॉम्प्युटर सेंटरचे संचालक संदेश साळवी , संचालीका सौ. सावी यांनी तहसिलदार मॅडम यांचे स्वागत करुन शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला .
Mrs. Pratibha Varale, New Tehsildar of Guhagar paid a visited on Suyash Computer Center at Abloli in the taluka. Savi Salvi welcomed the tehsildar and felicitated her with a shawl, coconut and a bouquet of flowers.
यावेळी तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे यांनी सुयश कॉम्प्युटर सेंटर मधील शैक्षणिक व विवीध सामाजिक उपक्रमांची माहिती घेऊन कौतूक केले तसेच विद्यार्थांसाठी करीयर मार्गदर्शन आणि महिलांसाठी उपदेशक शिबीर घेण्याचे नियोजन संदर्भात आपले प्रामूख्याने सहकार्य राहिल विद्यार्थी , शेतकरी , मजूरी करणारे पालक यांचे विवीध प्रकारचे दाखले व शासकिय कोणतीही कामे प्रलंबीत ठेऊ नका अशी सूचना करुन तहसिलदार कार्यालयातील प्रलंबीत कामे मार्गी लावण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील असा विश्वासही तहसिलदार सौ.प्रतिभा वराळे यांनी व्यक्त केला .
यावेळी तहसिलदार सौ.प्रतिभा वराळे , वेलदूरचे तलाठी डि.एन.आदलींग , शीरचे तलाठी एस.बी. राठोड , आबलोलीचे पोलीस पाटिल महेश भाटकर , सॉफ्ट टच हट इंजीनीयरींग सर्वीसेसचे संस्थापक समीर साळवी , सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीचे संचालक संदेश साळवी , संचालीका सौ. सावी साळवी , प्रविण आचरेकर , शुभम सावंत , रोहन शिर्के आदी.उपस्थीत होते .