गुहागर : तालुक्यातील पालशेत ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि तालुक्यातील पहिले वृत्तपत्र विक्रेते श्री. प्रमोद महादेव सैतवडेकर यांचे नुकतेच डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी ते ७५ वर्षांचे होते.
Former Sarpanch of Palshet Gram Panchayat in Guhagar taluka and the first newspaper seller in the taluka, Shri. Pramod Mahadev Saitwadekar recently died of disease while undergoing treatment at Walawalkar Hospital in Dervan. He was 75 years old at the time of his death.
काका या नावाने कै. प्रमोद सैतवडेकर सर्वांना परिचित होते. त्यांनी १० वर्षे पालशेत गावाचे सरपंच पद भूषविले होते. तसेच दैवज्ञ समाज, गुहागर तालुक्याचे तब्बल ४० वर्षे अध्यक्ष होते. पालशेतची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीच्या नवरात्र उत्सवाची सुरुवात त्यांनी श्री महालक्ष्मी मित्रमंडळाच्या माध्यमातून केली. या मंडळाची स्थापना ही त्यांनीच केली होती. एक कर्तव्यनिष्ठ सामाजिक कार्यकर्ते असलेले प्रमोद काका यांनी सामाजिक बांधिलकी आयुष्यभर अगदी मनापासून जपली. कोणाच्याही मदतीला तत्काळ धाऊन जाणाऱ्या काकांच्या निधनाने महालक्ष्मी मंदिर परिसरासह पालशेत मधील ग्रामस्थांमधून एक सच्चा सामाजिक कार्यकर्ता, ज्येष्ठ मार्गदर्शक आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे,भाऊ, भावजया, भाचे असा मोठा परिवार आहे.