गुहागर : पालशेत पोस्ट कार्यालयात गेली पस्तीस वर्षे सेवा बजावणारे रघुनाथ अनंत बापट हे गुरुवारी सेवेतून निवृत्त झाले. गुहागर कार्यालयाकडून त्यांना सत्कार करण्यात आला.
श्री. बापट हे पालशेत येथे पोस्ट कार्यालय सुरू झाल्यापासून ग्रामीण डाक सेवक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. सहाय्यक पोस्ट मास्तर या पदावर ते निवृत्त झाले आहेत. गुणवंत व निस्वार्थीपणे सेवा देणारे कर्मचारी अशी त्यांची ओळख होती . या पोस्ट कार्यालयात काम करत असताना त्यांनी चालू खात, बचत खाते, स्पीड पोस्ट, टाईम डिपॉझिट, आर. डी. या सुविधांची तत्पर सेवा ग्राहकांना देऊन आपला वेगळा ठसा उमटवला होता. गुहागर पोस्ट कार्यालयात त्यांचा निरोप समारंभ करण्यात आला. यावेळी गुहागरचे पोस्टमास्तर अरविंद रावळकर, क्लार्क पवन कुमार, पी. ए. घाणेकर, संकेश कुमार, ए.बी. बुट्टे, पोस्टमन प्रसाद भिडे, सुभाष केसरकर, महेश निमकर, सुवर्णा सांगळे आदी उपस्थित होते.