नगराध्यक्ष राजेश बेंडल, गुहागरातील पोस्टाचे स्थलांतर
गुहागर, ता. 01 नव्या जागेतील पोस्ट कार्यालयाचे उद्घाटन करताना राजेश बेंडल, योगेश जाधव, आदी मान्यवर शहरातील बाजारपेठेत असलेले पोस्टाचे कार्यालय मंगळवारी (ता. 1) शासकीय गोडावूनसमोर स्थलांतरीत झाले आहे. नव्या वास्तूतील पोस्ट कार्यालयाचे उद्घाटन गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी केले. पोस्टाने एटीएम सुविधा सुरु करावी. (Post should start ATM facility) अशी मागणी यावेळी बेंडल यांनी केली. तर आधार कार्ड वरील दुरुस्तीसाठी मागणी केल्यास गावागावात शिबीर घेतले जाईल. अशी माहिती डाक निरिक्षक योगेश जाधव यांनी दिली. Post should start ATM facility
गुहागर शहरातील बाजारपेठे नाका येथे अनेक वर्ष भाड्याच्या जागेत असलेल्या पोस्ट कार्यालय आता नवीन जागेत गेले आहे. गुहागर चिपळूण मार्गावरील शासकीय गोडावून जवळ प्रदिप बेंडल यांच्या इमारतीत पोस्टाचे कामकाज आजपासून सुरु झाले. Post should start ATM facility
स्थलांतरीत कार्यालयाचे उद्घाटनाचे वेळी नगराध्यक्ष बेंडल म्हणाले की, सर्वसामान्य जनतेचा आजही पोस्टावर पूर्णपणे विश्वास आहे. पोस्ट खात्यात बचत खाते, टी.डी., किसान विकास पत्र, एन्.ए.सी., पेन्शन योजना, मासिक प्राप्ती, संजय गांधी निराधार आर.डी. (Savings Account, TD, Kisan Vikas Patra, NAC, Pension Scheme, Monthly Scheme, Sanjay Gandhi Niradhar Scheme, R.D.,) यासारख्या सामान्य जनतेला आधार देणाऱ्या, कमी गुंतवणूकीच्या अनेक योजना आहेत. टपाल, मनिऑर्डर या जुन्या सेवांबरोबरच कुरिअर सेवेबरोबर स्पर्धा करणारी स्पीड पोस्ट (Speed Post) सेवा ही पोस्टाने सुरु केली आहे. आता तर नेट बॅकिंग (Banking) क्षेत्रातही पोस्ट कार्यालयाने पदार्पण केले आहे. नव्या वास्तुमधील कार्यालयाद्वारे पोस्ट अधिक लोकाभिमुख व्हावे. तालुका पोस्टाच्या दर्जाचे काम येवून व्हावे. Post should start ATM facility
यावेळी डाक निरिक्षक योगेश जाधव यांनी वरिष्ठ महाविद्यालय, गोडावून बस थांबा जवळ पोस्टाचे कार्यालय आल्याने कॉलेज विद्यार्थ्यांसह परगावातून येणाऱ्या ग्रामस्थांना नवे कार्यालय सहज उपलब्ध होईल. आधार कार्डमधील सुधारणांची सेवाही (Aadhaar Card updation) पोस्ट खात्यामार्फत दिली जात आहे. या सेवेसाठी ग्रामपंचायतीने मागणी केल्यास संबंधित गावात आधारकार्ड सुधारणा शिबीर (Aadhaar Card updation Camp)आयोजित करण्याचे कामही पोस्टाद्वारे होते. आजपर्यंत तालुक्यातील ३ गावांनी या सुविधेचा लाभ घेतला. त्यामध्ये 323 ग्रामस्थांच्या आधार कार्डांचे अद्ययन करुन दिले. Post should start ATM facility
स्थलांतर उद्घाटन कार्यक्रमला पोस्ट मास्तर नामदेव गुट्टे, सुभाष केसरकर, प्रदिप बेंडल, दिलखुश कुमार झा, पवन कुमार, संदिप टेकले, प्रसाद भिडे, व्ही. एम. शिंदे, एम. एम. निमकर, सुवर्णा जांगळी, अक्षय देवकर आदी उपस्थित होते. Post should start ATM facility