01.09.2020
गुहागर : तालुक्यातील मुंढर शिरबार वाडीत राजरोसपणे सुरु असलेल्या जुगार सुरु होता. या अड्ड्यावर गुहागर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी धाड टाकली. घटनास्थळावरुन पोलीसांनी सहा जणांना अटक केली आहे. मुंढर शिरबारवाडी येथे कोरोना काळातही मोठ्या प्रमाणात जुगार सुरु असल्याची माहिती गुहागर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी सायंकाळी 5 वा. पोलिसांनी अचानक जुगार सुरु असलेल्या घरावर धाड टाकली. त्यावेळी जुगार खेळणारे संजय ठसाळे (चिपळूण), लवेश विचारे (चिपळूण – पाग), देवेंद्र महाजन (चिपळूण – खेंड), शैलेश पवासकर (गुहागर -कारुळ), संदिप कदम (गुहागर – चिखली बौध्दवाडी), बाबू राठोड (चिपळूण) यांना पोलीसांनी रंगेहाथ पकडले. या धाडीत 86 हजाराचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला. त्यामध्ये वाहनांचाही समावेश आहे. पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या सहा जणांना अटक केली असून गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.