गुहागर : राज्यात मिनी लॉकडाऊनच्या आदेशानंतर अनावश्यकपणे बाजारात फिरणाऱ्या 23 वाहनचालक व 7 दुकानदारांवर गुहागर पोलिसांनी कारवाई करत त्यांच्यावर दंडात्मक वसूल केली आहे. तसेच विना मास्क फिरणाऱ्यांनाही दणका दिला आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संपूर्ण राज्यात मिनी लॉकडाऊन जारी केला आहे. त्यामध्ये शनिवारी व रविवारी संपूर्ण कडकडीत बंद ठेवून कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज बुधवारी रात्रीपासून 15 दिवसांचा लॉकडाऊन सुरू होणार आहे. मिनी लॉकडाउनमध्ये काही तरुण अनावश्यकपणे रस्त्यावर वाहनाने फेरफटका मारत असल्याने पोलिसांनी गुहागर व शृंगारतळीतील बाजारपेठेत कारवाई केली. 23 वाहन धारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली. तर विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच मंगळवारी बंदी आदेश असतानाही शृंगारतळी येथे सहा व गुहागर शहरात एक दुकान उघडे ठेवण्यात आल्याने या दुकानदारांवर कारवाई करून त्यांच्यावर प्रत्येकी एक हजार रुपये दंड लावण्यात आला आहे.