प्लास्टीकमुक्त भारत अभियान सहभागी झालेले आरजीपीपीएलचे अधिकारी व कर्मचारी
गुहागर, ता. 08 : प्लास्टीकमुक्तीबद्दल जनजागृती (Awareness) व्हावी यासाठी आरजीपीपीएलने रविवारी (ता. 6) अभियान राबविले. आरजीपीपीएल निवासी वसाहतीपासून रानवी फाटापर्यंतच्या रस्त्यावर आजुबाजुला पडलेला प्लास्टीक कचरा कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गोळा केला. Plastic Free India Campaign
आरजीपीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीमकुमार सामंता हे पर्यावरणवर प्रेम करणारे अधिकारी आहेत. संधी मिळेत त्या प्रत्येक कार्यक्रमात सामंता वृक्षलागवड (Plantation), स्वच्छता (Swaccha Bharat) आणि प्लास्टीकमुक्त भारत (Plastic Free India) या विषयांची जागृती करत असतात. आरजीपीपीएल कंपनीमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेवून अभियाने (Campaign) राबवत असतात. Plastic Free India Campaign
रविवारी (ता. 6 ) सकाळी असीमकुमार सामंतांच्या नेतृत्त्वाखाली असेच अभियान आरजीपीपीएल निवासी वसाहत ते रानवी फाटा या परिसरात राबविण्यात आले. कंपनीमधील अधिकारी आणि कर्मचारी रविवारी सकाळी 8 वा. सावित्री भवन येथे एकत्र आले. तेथून रानवी फाटा पर्यंतच्या रस्त्यावर आणि आजुबाजुला पडलेला सर्व प्लास्टीक कचरा गोळा केला. रस्त्याच्या दोन्ही बाजुला असलेल्या घरांमधील ग्रामस्थांना यावेळी प्लास्टीक कचरा बाहेर फेकु नका. घराच्या परसावात तो एकत्र करा. प्लास्टीकचा वापर टाळा. असा संदेश असीमकुमार सामंता यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिला. Plastic Free India Campaign
यापूर्वीही असीमकुमार सामंता यांच्या नेतृत्त्वाखाली गुहागरच्या समुद्रकिनारा, आरजीपीपीएल मेन गेट ते अंजनवेल फाटा, गोपाळगड किल्ला आदी ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली आहे. Plastic Free India Campaign
कंपनीच्या निवासी वसाहतीमध्ये सुमारे 200 नारळ, आंबा, काजू यांची लागवड (Plantation) करण्यात आली आहे. Plastic Free India Campaign