गुहागर : संपूर्ण महाराष्ट्रात पर्यावरण दिनानिमित्त बार्टी समतादूत प्रकल्पाअंतर्गत 5 ते 20 जून या पंधरवड्यात वृक्षारोपण अभियानांतर्गत निर्मल ग्रांपचायत आबलोली व जिल्हापरिषद केंद्र शाळा आबलोली नं. 1 येथील परिसरात गुहागर तालुका समतादूत शितल संग्राम पाटील यांच्या मार्फत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
Nirmal Gram Panchayat Abloli and Zilla Parishad Kendra School Abloli no.1 The tree planting program was carried out in the area at through Guhagar taluka Samatadoot Shital Sangram Patil.
या कार्यक्रमाला आबलोलीचे सरपंच तुकाराम पागडे, ग्रामसेवक बी. बी. सुर्यवंशी, समतादूत शितल पाटिल, गुहागर तालुका वनपाल श्री. ए. एन. निमकर, एस. व्हि. शेट्टे, वनपाल अरविंद मांडवकर, वनरक्षक श्री. झुंडगे, मंडळ अधिकारी श्री. एस. पी. गवळी, आबलोली तलाठी आनंद काजरोळकर, शिवणे तलाठी शुभम जाधव, कुडली तलाठी विनोद जोशी, ग्रामपंचायत सदस्या सौ. मिनल कदम, पूजा कारेकर, साक्षी रेपाळ, मुग्धा पागडे, आशिष भोसले, योगेश भोसले, अमोल शिर्के, मुख्याध्यापीका श्रीमती प्रिया गुहागरकर, संतोष मुंडेकर आदी उपस्थिती होते.
यावेळी समतादूत शितल पाटील यांनी झाडे लावा झाडे जगवा या विषयी माहिती देऊन प्रत्येकाने किमान एकतरी झाड लावून त्याचे मुलाप्रमाणे संगोपण करावे असे आवाहन केले. तर ग्रामसेवक श्री. सुर्यवंशी यांनी वृक्ष लागवडीचे महत्व या विषयी मार्गदर्शन केले.