गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोव्हिडचे सर्व नियम पाळून रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू उपस्थित होते.
On the occasion of the birthday of Maharashtra Navnirman Sena president Raj Thakare, trees were planted on both sides of the road in Guhagar taluka on behalf of Maharashtra Navnirman Sena following all the rules of Kovid. BJP’s North Ratnagiri district president Dr. Vinay Natu was present.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यालय असलेल्या चिखली येथील राजगड येथे मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. माजी आमदार व भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ.विनय नातू, महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुकाध्यक्ष विनोद जानवलकर, माजी तालुकाध्यक्ष राजेश शेटे, महिला तालुका अध्यक्ष सानिया ठाकूर, महिला विभाग अध्यक्ष व तळवली सरपंच मयुरी शिगवण, ग्रामपंचायत सदस्य वैभवी जानवळकर, राहुल जाधव, तेजस पोकळे, संजय भुवड, गंगाराम खांबे, दिनेश निवाते, रुपेश घवाले, कौस्तुभ कोपरकर व तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्गावरील झोंबडी ते मोडकाआगर दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने माजी आमदार डॉ. नातू यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.