सुरुंग स्फोटामुळे घरांना तडे; पाण्याचे स्रोत दुषित
गुहागर : गुहागर तालुक्यातील पवारसाखरी येथील स्थानिकांचा मायनींगला विरोध आहे. तरीही ग्रामपंचायत साखरीबुद्रुक, खुर्द कार्यक्षेत्रामध्ये दगड माती उत्खनन करण्यासाठी सुरुंग लावल्याने घरांना तडे जात आहेत. सदरील उत्खनन थांबविण्यात यावेत, असे पत्र साखरीबुद्रुक, खुर्द ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
Locals of Pawarsakhari in Guhagar taluka are against mining. Still in Gram Panchayat Sakhribudruk, Khurd area Homes are being eroded by landmines for excavating stone soil. Such excavations should be stopped, Such a letter has been given to the Collector by Sakharibudruk, Khurd Gram Panchayat.
तालुक्यातील कोकण एलएनएजी प्रकल्पाद्वारे समुद्रात ब्रेकवॉटर वॉल बांधण्याचे कामाला सुरवात होणार आहे. या कामासाठी समुद्राच्या तळाशी विविध आकारातील आणि विविध वजनांचे दगड वापरून एक स्ट्रक्चरच तयार केले जाणार आहे. ते दगड मिळविण्यासाठी पवारसाखरी परिसरात या ठिकाणी सुमारे 14 लाख टन दगडाचे उत्खनन होणार आहे. या उत्खननाला स्थानिकांनी आपला विरोध असल्याचे लेखी पत्र प्रशासनाला आदीच दिले आहे. पवारसाखरीत होणाऱ्या उत्खननामुळे आमच्या घरांना धोका निर्माण होणार आहे. खाणीमुळे या ठिकाणचे पाण्याचे स्रोत नष्ट होतील अशी भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे आमच्या मुळावर येणारे उत्खनन आम्हाला नको, अशी भूमिका स्थानिकांची आहे.
ग्रामपंचायत साखरी बुद्रुक, खुर्द कार्यक्षेत्रामध्ये बालाजी इन्फ्राटेक अँड कन्ट्रक्शन प्रा. लि. कडून दगड माती उत्खनन करण्याचे काम सुरु आहे. दगड उत्खनन करत असताना मोठ्या प्रमाणात वारंवार सुरुंग स्फोट केले जातात. त्यामुळे आजुबाजुच्या वाडीवस्तीतील लोकांच्या घरांना तडे पडून भिंती कोसळत आहेत. याबाबत वारंवार लेखी कळवूनही अद्यापहि संबंधित कंपनीकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. तसेच दि. १० नोव्हें. २०२१ रोजी दुपारी १:२० वाजता अती तीव्रतेचे सुरुंग स्फोट झाले आहेत. कंपनीकडून कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे ग्रामपंचायत मार्फत कळविण्यात येते की जो पर्यंत लोकांची नुकसान भरपाई मिळत नाही, तसेच सुरुंग स्फोटकावर आपले नियंत्रण होत नाही, तो पर्यंत कोणत्याही प्रकारचे सुरुंग स्फोट करू नये असे पत्र जिल्हाधिकारी, जिल्हा खाणीकर्म, गुहागर तहसीलदार यांना देण्यात आले आहे.