रत्नागिरीच्या पार्थि मेहंदळे हिचा सहभाग
गुहागर : शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून आम्ही बालकवी सिंधुदुर्ग या सामाजिक संस्थेमार्फत मिरगोत्सव या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध जिल्हयातील ३० बालकवी, त्यांचे पालक व शिक्षकांनी मोठया उत्साहाने सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात रत्नागिरीच्या पार्थि मेहंदळे हिने सहभाग घेतला होता.
The online program ‘Mirgotsav’ was organized by Balakavi Sindhudurg on the occasion of the Justifying the coronation ceremony Shivchhatrapati Shivaji Maharaj. Parthi Mehendale of Ratnagiri had participated in this program.
सदरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बालकवींनीच मेहनत घेतली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी तनिष्का सावंत या होत्या. प्रस्थावना व इशस्तवन कु. वैभवी रेडकर, सुत्रसंचालन कु. सिध्दी सोसे व मैत्रेयी हीर्लेकर यांनी केले. प्रस्तावना जुई परब तर आभार सौ प्रणाली सावंत यांनी मानले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या ३० बालकवींनी उत्कृष्टपणे सादरीकरण केले. यावेळी मुलांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा, पावसावर कविता, गाणी, गोष्टी तर हार्मोनियमच्या तालावर गीते सादर केली. अशा विविधांगी नटलेल्या कार्यक्रमाची धुरा सौ. देवयानी आजगाकर व संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र गोसावी यांनी सांभाळली. या कार्यक्रमानंतर पालकांनीहि आपली मते व्यक्त करून कार्यक्रमाचे कौतुक केले.