पालशेत सागरकिनारी गाज रिसॉर्ट तर्फे दिवाळी पहाट मैफल
गुहागर : विशाल समुद्रकिनारा, पहाटे शुभ्र धुक्यात अंगावर रोमांच आणणारा सुरुबनातील गार वारा, पक्ष्यांचे गुंजन आणि जोडीला सागराची गाज अशा रम्य वातावरणात ‘गाज स्वरगंध’ दिवाळी पहाट मैफल पंडीत उपेंद्र भट यांच्या गायनाने उत्तरोत्तर रंगली. गुहागर तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी रंगलेल्या या मैफलीला रसिकांनी दाद दिल्याने ही पहाट उजळून निघाल्याचे पहायला मिळाले.
Upendra Bhat’s singing of ‘Gaj Swargandh’ Diwali dawn concert was in full swing in the atmosphere of the vast beach, the cool breeze of Surubana, the humming of birds and the roar of the sea. The dawn dawned as the audience appreciated the colorful concert at Palshet beach in Guhagar taluka.
पालशेत गाज रिसॉर्टतर्फे ‘गाज स्वरगंध’ हा प्रथमच दिवाळी पहाटेचा कार्यक्रम रविवारी पहाटे पार पडला. अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेल्या गाज रिसॉर्टचे जितेंद्र जोशी यांनी गुहागरवासीयांना दिलेल्या या अनोख्या दिवाळी भेटीचे सर्वांनी कौतुक केले. या मैफलीत भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य किराणा घराण्याचा वारसा चालवणारे श्री. पंडित उपेंद्र भट यांचे शास्त्रीय गायन झाले. शास्त्रीय गायकीवर आधारित ‘मोरे मन लागो नंदरवा’ ही तोडी रागातील बंदिश, गीत रामायणातील निवडक गीते, खास फर्माईश म्हणून ‘प्रथम तुज पाहता’ व ‘सखी मंद झाल्या तारका’ अशी सदाबहार गीते व नाट्यगीते यांनी मैफल रंगली. सागर किनाऱ्यावर सजलेल्या या मैफिलीला भोवतलाच्या वातावरणाने ‘चार चाँद’ लागले.