• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पालशेत नं १ शाळेत रंगली ऑनलाईन कथाकथन स्पर्धा

by Ganesh Dhanawade
September 2, 2021
in Old News
16 0
0
पालशेत नं १ शाळेत रंगली ऑनलाईन कथाकथन स्पर्धा
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

ओवी चव्हाण,अर्णव तांबे, रियांश पटेकर यांची बाजी

गुहागर : गुहागर तालुक्यातील जि.प च्या पालशेत नं.१ आदर्श प्रशालेच्या वतीने शाळा बंद पण शिक्षण सुरू उपक्रमांतर्गत ऑनलाईन कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत ओवी अतिष चव्हाण हीने प्रथम, अर्णव सचिन तांबे याने व्दितीय रियांश प्रदिप पटेकर याने तृतीय तर निहार राजेश पाटील याने चौथा,सृष्टी अजय कनगुटकर हीने पाचवा क्रमांक पटकावून सुयश संपादीत केले.

On behalf of Adarsh ​​School No. 1, Palshet, ZP, Guhagar taluka School closed but education started under the initiative an online storytelling competition was organized. In this competition, OV Atish Chavan won the first place, Arnav Sachin Tambe won the second place and Pradip Patekar won the third place.

सदर स्पर्धा अडूर व पोमेंडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीकांतजी वेल्हाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली सर्व  सहभागी विद्यार्थ्यांना, पालकांना साहेबांनी मार्गदर्शन केले. कोवीड काळात विद्यार्थी शिक्षण सुरू ठेवण्यासाठी राबवत असलेल्या शाळेच्या  विविध उपक्रमांचे कौतुकही केले. या स्पर्धेत उत्कृष्ट कथा सादर करणा-या विजेत्या विद्यार्थ्यांचा शाळा व्यवस्थापन समिती व पालकांतर्फे सन्मान करण्यात येणार आहे. त्यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अतिष चव्हाण, उपाध्यक्षा प्रित पटेकर व सदस्य तसेच पालक बंधुभगिनी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी, मुख्याध्यापिका दर्शना समगिस्कर, उपशिक्षक संतोष गावडे, उपशिक्षक बाबासाहेब राशिनकर यांनी मेहनत घेतली तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी वामन जगदाळे, शिक्षण विस्तार अधिकारी लीना भागवत, केंद्रप्रमुख श्रीकांत वेल्हाळ व शिक्षक बंधुभगिनींनी विजेत्यां विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून उपक्रमांचे कौतुक केले आहे.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarऑनलाईन कथाकथन स्पर्धाकोविडजि.प पालशेत नं.१ शाळाटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युजशाळा व्यवस्थापन समिती
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.