• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेलदूर येथे नेत्र चिकित्सा शिबीर संपन्न

by Ganesh Dhanawade
January 4, 2022
in Guhagar
16 0
0
वेलदूर येथे नेत्र चिकित्सा शिबीर संपन्न
32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : भोई सेवा संघ चिपळूण(Bhoi Seva Sangh Chiplun) यांच्यावतीने एक्सेल इंडस्टिज लिमिटेड(Excel Industries Ltd.), श्री विवेकानंद रिसर्च एण्ड ट्रेनिंग सेंटर इंस्टिट्यूट(Sri Vivekananda Research and Training Center Institute), परशुराम हॉस्पिटल चिपळूण(Parashuram Hospital Chiplun) यांच्या सहकार्याने नुकतेच गुहागर तालुक्यातील वेलदूर येथे नेत्रचिकित्सा शिबिर(Ophthalmology camp) पार पडले.

या शिबिरामध्ये अंजनवेल भोईवाडी म्हातारखाडी(Bhoiwadi Mhatarkhadi) आणि वेलदूर भोईवाडी(Veldur Bhoiwadi) या गावातील सुमारे १४० ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला. यामध्ये ३६ जणांना मोतीबिंदूचे ऑपरेशन(Cataract surgery) करण्याची आवश्यकता आहे. तसेच ६२ जणांना लांबचा किंवा जवळचा दृष्टीदोषाचा(Visual impairment) आजार असल्याचे निदान करण्यात आले. नेत्र चिकित्सा शिबीर संपन्न होण्यासाठी श्री विवेकानंद रिसर्च अॕण्ड ट्रेनिंग इंस्टिट्यूटचे श्री. सुरेश पाटणकर,भोई समाज सेवा संघ चिपळूण अध्यक्ष मधुकर निवाते, श्री. विजयशेठ, श्री. अनिल निवाते, श्रीकांत निवाते, श्री. स्वप्नील महाडीक यांनी या शिबिराच्या आयोजनामध्ये विशेष सहकार्य केले. तसेच या शिबिराच्या आयोजनामध्ये भोई समाजाचे नेते आणि माजी पंचायत समिती सभापती विठ्ठल भालेकर, अनिल खडपेकर, भाऊ मिशाल, संतोष कांबरे, प्रकाश पड्याळ, रविंद्र पड्याळ, सचिन डांगे, संदेश पड्याळ, मनोहर पारधी, गणेश पारधी, सुरेश निवाते आणि रामचंद्र डांगे यांनी हे शिबीर यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

Tags: Bhoi Seva Sangh ChiplunCataract surgeryExcel Industries LtdGuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in GuhagarOphthalmology campParashuram Hospital ChiplunShri Vivekananda Research and Training Center Instituteएक्सेल इंडस्टिज लिमिटेडटॉप न्युजताज्या बातम्यादृष्टीदोषनेत्रचिकित्सा शिबीरपरशुराम हॉस्पिटल चिपळूणभोई सेवा संघ चिपळूणमराठी बातम्यामोतीबिंदूलोकल न्युजश्री विवेकानंद रिसर्च एण्ड ट्रेनिंग सेंटर इंस्टिट्यूट
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.