डॉ. नातू महाविद्यालयातर्फे प्रथमच ऑनलाईन स्पर्धा
03.09.2020
गुहागर : मार्गताम्हाने ता. चिपळूण येथील डॉ. तात्यासाहेब नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी विभागाच्यावतीने राष्ट्रस्तरीय हिंदी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा ऑनलाइन पध्दतीने घेण्यात येणार आहे. या स्पर्धेचा विषय हिंदी और राष्ट्रीय एकात्मता हा आहे.
या स्पर्धेची माहिती देताना प्राचार्य डॉ. विजयकुमार खोत म्हणाले की, या स्पर्धेत पदवीपूर्व व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. स्पर्धकांनी ऑनलाइन पध्दतीने नाव नोंदणी केल्यावर त्यांना एक क्रमांक (स्पर्धक क्रमांक) दिला जाईल. स्पर्धकाने ऑनलाइन पध्दतीनेच स्पर्धेत सहभाग घ्यायचा आहे. हिंदी व राष्ट्रीय एकात्मता या विषयावरील आपला व्हिडिओ गुगल ड्राईव्हवर 14 सप्टेंबर पर्यंत अपलोड करावा. त्याची लिंक महाविद्यालयाला पाठवायची आहे. महाविद्यालयाने नेमलेले परिक्षक हे व्हिडिओ पाहून स्पर्धेचा निकाल जाहीर करतील. स्पर्धेची वेळ कमीत कमी पाच मिनिटे किंवा अधिकाधिक सात मिनिटे अशी राहील. व्हिडिओ बनविताना सुरवातीला स्पर्धकाने केवळ संयोजक महाविद्यालयाच्या नावाचा (डॉ. तात्यासाहेब नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयात, मार्गताम्हाने) आणि स्पर्धक क्रमांकाचा उल्लेख करायचा आहे. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या स्पर्धकास रु. 1 हजार, द्वितीय क्रमांकाला रु. 900 व तृतीय क्रमांकाला रु. 800 असे बक्षिस व प्रमाणपत्र देण्यात येईल. या स्पर्धेसंदर्भातील अधिक माहितीसाठी इच्छुक स्पर्धकांनी प्रा. शांतीलाल रावळ (9881676630) व प्रा. सुरेश सुतार (9146604188) यांच्याकडे संपर्क साधावा. ऑनलाईन स्पर्धा असल्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी प्राचार्य डॉ. विजयकुमार खोत यांनी केले.