कार्यकर्त्यांबरोबर संवाद, सीआरझेड बैठक व आरजीपीपीएलला भेट देणार
गुहागर, ता. 25 : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार (BJP state secretary, former MP) नीलेश राणे (Nilesh Rane) 27 जानेवारीला गुहागरला येणार आहेत. (On 27th Jan Nilesh Rane in Guhagar) येथील भाजप कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधल्यानंतर ते रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीला भेट देणार आहेत. तसेच सायंकाळी सीआरझेड संदर्भात येथील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. अशी माहिती भाजप तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी दिली आहे.
नीलेश राणे (Niles Rane) (BJP) दोन दिवस रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याची सुरवात 27 जानेवारीला गुहागरपासून होणार आहे. (On 27th Jan Nilesh Rane in Guhagar) गुरूवारी 27 जानेवारीला सकाळी ११ वा. ते गुहागरात भाजपा (BJP) पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी १ वा. आरजीपीपीएल (RGPPL) कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. ४ वा. सीआरझेड संदर्भात अधिकाऱ्यांशी बैठक होणार आहे. त्यानंतर रत्नागिरीकडे प्रयाण कराताना राई येथे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश शेवडे यांची भेट राणे घेतली.
28 जानेवारीला नीलेश राणे (Nilesh Rane) हे संगमेश्वर तालुक्यात आहेत. सकाळी ११ वा. ओझरे जिल्हापरिषद गटातील कार्यकर्त्यांबरोबर संवाद, दुपारी 1 वा. जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रश्मी कदम यांची भेट, २.३० वाजता देवरूख शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद, दुपारी ३.३० वा. आरवली जिल्हापरिषद गटातील कार्यकर्त्यांशी संवाद, सायं. ६ वा. चिपळूण शहर कार्यकारिणी बैठक असा कार्यक्रम आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांपूर्वी होणाऱ्या भाजप प्रदेश सचिवांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. (On 27th Jan Nilesh Rane in Guhagar)