चालक-मालक यांनी आ. भास्कर जाधव व जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांचे मानले आभार
गुहागर : गेली 25 वर्षे रखडलेला प्रश्न वेळंब फाटा, शृंगारतळी बाजार पेठ व पालपेणे फाटा येथे अधिकृत रिक्षा स्टाॅप उभारण्याचा प्रश्न आ. भास्करशेठ जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून मार्गी लागला आहे. या रिक्षा स्टाॅपचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
The question of setting up a rickshaw stop. Bhaskarsheth Jadhav’s special efforts have paved the way. The rickshaw stop was inaugurated by Zilla Parishad President Vikrant Jadhav.
यावेळी रिक्षा चालक-मालक यांनी अध्यक्ष विक्रांत भास्कर जाधव यांचे जंगी स्वागत केले व सर्वांनी आमदार भास्कर जाधव व अध्यक्ष विक्रांत भास्कर जाधव यांचे मनापासून आभार मानले व आनंद देखील व्यक्त केला.
अधिकृत रिक्षा स्टाॅप उभारण्यात आल्याने रिक्षा चालक-मालक यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती सुनिल पवार, सरपंच संजय पवार, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण ओक, अनंत चव्हाण, विनायक मुळे, सत्यप्रकाश चव्हाण आदींसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.