गुहागर : विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या जिल्हा कार्यकारणीने दिला आहे.
Constitution Day on 26th November to meet various demands The district executive of OBC struggle coordination committee has warned to agitate in front of the district collector’s office.
रत्नागिरी जिल्हा ओबीसी संघर्ष समन्वय समिती जिल्हा कार्यकारिणी पहीली सभा ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष चंद्रकांत बावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार रत्नागिरी शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. नुतन जिल्हाध्यक्ष शरदचंद्र गीते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या जिल्हा कार्यकारणीसाठी जिल्ह्यातील ९ तालुक्यातील जिल्हा कार्यकारणी सदस्य, तालुका कार्यकारणी पदाधिकारी व मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. यावेळी ओबीसींची जातनिहाय जनगणना, ओबीसींचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आरक्षण इत्यादी महत्त्वांच्या मागण्यांकरता 26 नोव्हेंबर या संविधान दिनी रत्नागिरी जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या विराट मोर्चा करता जिल्ह्यातून २५ हजार ओबीसी बंधु – भगिनीना रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणी एकत्र आणण्याचे ठरविण्यात आले आहे. याकरता प्रत्येक तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीने तालुक्याच्या ठिकाणी नियोजन करून ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या समाजातील सर्व घटकांना या विराट मोर्चात सहभागी होण्याकरता प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.
या जिल्हा कार्यकारिणी सभेला राज्य कार्यकारीणी सदस्य कुमार शेटे, सरचिटणीस संतोष सोलकर, पांडुरंग पाते, बी.टी. कांबळे, प्रकाश मांडवकर, मिलिंद येवलेकर, प्रकाश साळवी, आप्पा आडिवरेकर, तानाजी कुळे, रमेश पांगल, राजीव किर, निलेश सुर्वे, सुवर्णा पावस्कर, पूजा कारेकर, नंदकुमार मोहिते, सुधीर वासावे, साक्षी रावणंग, चंद्रकांत पागडे आदींसह अन्य मंडळी उपस्थित होती.