गुहागर : गुहागर तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समिती अंतर्गत उपसमिती पडवे जिल्हा परिषद गटाची बैठक आबलोली येथील कुणबी नागरी पतसंस्थेच्या सभागृहात तालुक्याचे सरचिटणीस निलेश सूर्वे, मार्गदर्शक रामचंद्र हुमणे, विलास गुरव, पूजा कारेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या पडवे जिल्हा परिषद गट उपसमिती पदाधिकारी व सदस्य यांची निवड करण्यात आली.
त्यामध्ये अध्यक्ष पदी रविंद्र रामचंद्र कुळ्ये – काताळे, उपाध्यक्ष – रामचंद्र गोपाळ गुरव – आवरे, सतिश सदानंद खेडेकर – कुडली, संतोष नारायण पावरी – कुडली, विजय यशवंत पागडे – आबलोली, मंगेश चंद्रकांत गडदे – तवसाळ, सरचिटणीस – प्रमेय प्रदिप आर्यमाने – आबलोली, मंदार मुकुंद रहाटे – कुडली खजिनदार – पूजा प्रवीण कारेकर यांची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली. तर समिती सदस्य म्हणून संदीप दगडू पाष्टे, विजय सोनू मसुरकर,शंकर जानु जोशी, शंकर रामचंद्र यद्रे, संतोष श्रीधर सुर्वे, कमलाकर गंगाराम गुरव, मनोज मोतीराम गुरव, बजरंग एकनाथ गुरुसुळे,दिनेश परशुराम नेटके, वसंत यशवंत सागवेकर, श्याम पांडुरंग पावरी, संतोष रामा पावरी, रमेश शंकर पांचाळ, विकास वसंत मेस्त्री, सुभाष शंकर कोळवणकर, दिनेश विजय शेटे, संतोष दत्ताराम आंब्रे, ऋषिकेश सुनील भोसले, राजेंद्र विठ्ठल काताळकर, सुचित रघुनाथ मिरगल, नंदकिशोर करवंदे, दिनेश रमेश महाडिक, सुभाष विठ्ठल पवार, महेश शशीकांत भाटकर यांची निवड करण्यात आली.