अध्यक्षपदी पांडुरंग पाते, सरचिटणीस पदी निलेश सुर्वे
गुहागर : ओबीसी संघर्ष समन्वय समिती (OBC Morcha) गुहागरची पुढील तीन वर्षासाठी नूतन कार्यकारिणी (New Committee) निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी पांडुरंग गणपत पाते तर सरचिटणीस पदी निलेश विश्वनाथ सुर्वे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कोतळूक गोरीवले वाडी येथे पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. कार्यकारिणीचा कालावधी ३ वर्षे असून दि.१ जानेवारी २०२२ ते दि. ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत कार्यकारणी कामकाज पाहणार आहे. (OBC Morcha New Committee)
सभेत ११ प्रमुख पदाधिकार्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून उर्वरित पदाधिकाऱ्यांची नावे लवकरच जाहीर करण्यात येतील तसेच तालुक्यातील सर्व ओबीसी समाज घटकांना एकत्रित घेऊन राज्य व जिल्हा नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली ओबीसींची संघटित ताकद उभी करण्याचा प्रयत्न असेल असे अध्यक्ष पांडुरंग पाते यांनी सांगितले. OBC Morcha New Committee
नवीन कार्यकारणी मध्ये अध्यक्ष : पांडुरंग गणपत पाते, उपाध्यक्ष : अरविंद पालकर, उपाध्यक्ष : शशिकांत पवार, उपाध्यक्ष : दिपक पालशेतकर, उपाध्यक्ष : संतोष धामणस्कर, सरचिटणीस : निलेश विश्वनाथ सुर्वे, सहचिटणीस : नरेश निमुणकर, सहचिटणीस : उदय गोरीवले, सहचिटणीस : मुकुंद पानवलकर, सहचिटणीस : किरण भोसले, खजिनदार अजित बेलवलकर यांची निवड करण्यात आली आहे. लवकरच कार्यकारिणी सदस्य,सल्लागार, माहिती व प्रसिद्धी प्रमुख तसेच कायदेविषयक सल्लागार यांची निवड करण्यात येणार आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.