किर्तनवाडी रस्ता, गुहागर नगरपंचायत करणार कारवाई
गुहागर, ता. 21 : शहरातील किर्तनवाडी ते गुहागर चिपळूण मार्गावरील विश्रामगृहापर्यंतचे रस्त्याची देखभाल करत नसल्याने राजेंद्र बेर्डे या ठेकेदारावर कारवाई करण्याचा ठराव गुहागर नगरपंचायतीने केला त्यामुळे. या ठेकेदाराची 5 लाख 30 हजाराची सुरक्षा अनामत जप्त होणार आहे. ( Np will confiscate deposit of contractor)


जानेवारी 2017 मध्ये गुहागर शहरातील असगोली कडे जाणारा रस्तावरील जि.प. शाळेपासून गुहागर चिपळूण मार्गावरील विश्रामगृहापर्यंतच्या रस्त्याचे काम राजेंद्र बेर्डे या ठेकेदाराला मिळाले होते. या कामात भंडारी भवन जवळील पुलाच्या कामाचाही समावेश होता. हे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. मुळ रस्त्यापासून पुलाची उंची वाढली. त्यामुळे ठेकेदाराने योग्य पध्दतीने पुल आणि रस्ता जोडून घेणे आवश्यक होते. मात्र हे कामही योग्य रितीने झालेले नाही. त्यामुळे आज पुल आणि रस्त्यामध्ये अर्धा फुट उंचीची पायरी तयार झाली आहे. Np will confiscate deposit of contractor
राजेंद्र बेर्डे यांच्याकडून देखभाल दुरुस्तीपोटी 5 लाख 30 हजाराची अनामत नगरपंचायतीकडे जमा आहे. नगरपंचायतीने वारंवार ठेकेदाराशी संपर्क साधुन रस्त्याच्या दुरुस्तीबाबत विनंती केली. ठेकेदाराने गेल्या 3 वर्षात याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अखेर नगरपंचायतीने ठेकेदारा अनामत का जप्त करण्यात येवू नये अशी नोटीस पाठवली. तीन नोटीसा पाठवूनही ठेकेदाराने उत्तर दिले नाही. त्यामुळे याबाबत ठेकेदाराचे काहीही म्हणणे नाही असे समजून अनामत जप्त करण्याचा ठराव गुहागर नगरपंचायतीने केला आहे. (Np will confiscate deposit of contractor)
दरम्यान 13 जानेवारीला शहर भाजपचे अध्यक्ष संगम मोरे यांच्या नेतृत्त्वाखाली निकृष्ट रस्त्याची पहाणी करण्यात आली होती. त्यावेळी भाजपचे गटनेते किर्तनवाडीचा रस्त्याचे निकृष्ट दर्जाच्या असल्याने अनेक ठिकाणी खड्डे पडले आहे. नगरपंचायतीने ठेकेदाराकडून या रस्त्याची त्वरीत डागडूजी करुन घ्यावी किंवा ठेकेदाराची अनामत जप्त करावी. ( Np will confiscate deposit of contractor) अशी मागणी भाजप गटनेते उमेश भोसले यांनी केली होती.