गुहागर : जपान येथे होणाऱ्या ३८ व्या जागतिक रिद्मिक जिमनॅस्टिक्स चॅम्पियनशीप २०२१ या स्पर्धेसाठी भारताचे नेतृत्व करण्यासाठी निरजा सचिन चव्हाण हिची निवड झाली असून तिने यासाठी नुकतेच जपानला प्रयाण केले.
For the 38th World Rhythmic Gymnastics Championships 2021 in Japan. Nirja Sachin Chavan has been selected to lead India She recently flew to Japan for this.


गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथील निवृत्त परिवहन अधिकारी श्री. भालचंद्र ऊर्फ भाई चव्हाण यांचा पुतण्या सचिन चव्हाण यांची निरजा ही सुकन्या आहे. तिचे शालेय शिक्षण मुंबई येथे झाले असून लहानपणा पासूनच तिला जिमनॅस्टिक्समध्ये मोठी आवड होती. जपानमध्ये भरणाऱ्या ३८ व्या जागतिक जिमनॅस्टिक्स स्पर्धेसाठी तिची भारतातर्फे प्रतिनिधी म्हणून निवड झाली असून त्यासाठी ती नुकतीच जपानला रवाना झाली आहे. तिच्या या निवडीने पाटपन्हाळे गावातर्फे तिचे अभिनंदन करण्यात येत असून तिच्या पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. यापूर्वी तीने अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. शालेय जीवनातही तिने अनेक पारितोषिकही मिळवली आहेत.

