नीलेश राणे : भाजपमध्ये 47 जणांचा पक्षप्रवेश
गुहागर, ता. 27 : प्रतिकुल परिस्थितीत कार्यकर्ते मेहनतीने पक्ष वाढवत आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र मुळमुळीत काम करुन अपेक्षित यश मिळणार नाही. त्यासाठी झुंझावे लागेल. विरोधकांना अंगावर घ्यावे लागेल. लोकांच्या प्रश्र्नांसाठी आंदोलने करा. रस्त्यावर उतरा. तरच जनता तुम्हाला साथ देईल. असे प्रतिपादन भाजप प्रदेश सचिव (BJP) नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी शृंगारतळी येथे केले. (Nilesh Rane in Guhagar)


Nilesh Rane in Guhagar
गुहागर (Guhagar) तालुक्यातील भाजप (BJP) कार्यकारीणी आणि शक्ती केंद्र प्रमुखांच्या मेळाव्याला आज माजी खासदार व भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आपल्यासमोर मोठी शक्ती उभी असते तेव्हा कार्यकर्त्यांना पक्ष उभा करण्यासाठी झगडावे लागते. पक्षाला बळ देताना कार्यकर्ता खचता कामा नये. आज तुम्ही जे चित्र उभे केले आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे. 105 आमदार असूनही शिवसेनेने (Shivsena) गद्दारी केल्यामुळे भाजप सत्तेबाहेर आहे. ज्यांना सत्तेत येऊ असे वाटले नव्हते असे मंत्री झाले. तरीही इथल्या आमदाराला उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackrey) मंत्री केले नाही. तीन वेळा निवडून आलेल्या आमदारांनी या तालुक्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी काम केले नाही. अन्य ठिकाणच्या किनारपट्टीवर (Beach) उद्योगधंदे वाढत असताना गुहागरतल्या किनाऱ्यांवरची दुकाने काढून टाकली जातात. कोविड (Covid19) काळात तालुक्यात हॉस्पिटल (Hospital) उभे करता आले नाही. सिंधुदूर्गसह गणपतीपुळ्यात (Ganpatipule) 82 ते 70 टक्के पर्यटक येतात. गुहागरमध्ये किती येतात. कारण इतक्या वर्षात इथे यावे असे काहीच उभे राहीले नाही. सभागृहात यांनी कधी गुहागरचा प्रश्र्न मांडला नाही. फक्त पंतप्रधानांची नक्कल करता येते. (Nilesh Rane in Guhagar)


आता जे काही करायचे ते जिंकण्यासाठीच करायचे हे निश्चित करा. विकासासाठी कितीही निधी मागा भाजप द्यायला तयार आहे. पण विकासाच्या निधीतून कामे करताना ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद बांधायचा आहे हे लक्षात ठेवा. नाहीतर निधी आपला आणि बारसे दुसरे करुन जातील. आज मतदारसंघात अनेक नाराज कार्यकर्ते आहेत. त्यांना भाजपच्या शक्तीबद्दल विश्र्वास वाटला पाहिजे. जनतेच्या समस्यांसाठी आक्रमकपणे आंदोलने करा. रस्त्यावर उतरा. राजकीय केसेसना घाबरु नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत. (Nilesh Rane in Guhagar)
यावेळी भाजपचे संतोष जैतापकर, सौ. नीलम गोंधळी, लक्ष्मण शिगवण, नीलेश सुर्वे, संतोष मालप, सौ. रश्मी पालशेतकर, श्रद्धा घाडे, सचिन ओक, दापोलीचे तालुकाध्यक्ष मकरंद म्हादलेकर आदी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (Nilesh Rane in Guhagar)


भाजपमध्ये 47 जणांचा पक्षप्रवेश
गेल्या 15 वर्षात गुहागर (Guhagar) मध्ये पक्ष प्रवेश कार्यक्रमांची संस्कृती रुढ झाली आहे. आज त्याच पावलावर पाऊल टाकत भाजपने (BJP) देखील प्रथमच मोठ्या नेत्याच्या उपस्थित पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाचा अंतर्भाव आपल्या कार्यक्रमात केला. भाजप प्रदेश सचिव नीलेश राणे (Nilesh Rane) यांच्या उपस्थितीत 5 गावांमधील 47 कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. (Nilesh Rane in Guhagar)
आजपर्यंत भाजपने कधीही मोठा गाजवाजा करत पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम केले नव्हते. मात्र पक्ष प्रवेशांची होणारी चर्चा पक्षवाढीला बळ देते. हे लक्षात घेवून यावेळी प्रथमच भाजपने (BJP) देखील पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाचा अंतर्भाव आजच्या मेळाव्यात केला. पांगारी, शीर, पालशेत, जामसुद या चार गावांमधील वाडी कार्यकर्ते, महिला मंडळाच्या कार्यकर्त्या यांना भाजप प्रदेश सचिव यांच्याहस्ते भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. पक्ष प्रवेशाचा हा कार्यक्रम मुख्य कार्यक्रमानंतर स्वतंत्रपणे घेण्यात आला. (Nilesh Rane in Guhagar)
या कार्यक्रमामध्ये जामसुदमधील शिवसेना शाखाप्रमुख जयवंत सावंत, माजी शाखाप्रमुख दिनेश साळवी यांच्यासह सुरेश पाते, विनायक पाते, मदन .पिंपळे, जगन पिंपळे, विराज गुरव, अभिजीत सावंत, राज साळवी, संतोष साळवी, शुभम साळवी, ऋषिकेश बोरकर या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
शीर ठोंबरे वाडीचे वाडीप्रमुख सखाराम ठोंबरे यांच्यासह दत्ताराम ठोंबरे, सोमनाथ ठोंबरे, भागोजी ठोंबरे तसेच शीर कुंभारवाडीचे वाडीप्रमुख रमेश साळवी, विद्याधर तथा दादू गुरव, रणजीत आंबेकर, शुभम ठोंबरे यांनी नीलेश राणेंच्या उपस्थित भाजपचा झेंडा हाती घेतला.
पांगारी तर्फे वेळंब मधील अनिल सदाशिव वणे, पांडुरंग वणे, संजय वणे, विनोद वणे, सुर्यकांत वणे, कृष्णा वणे, रामचंद्र वणे, यशवंत वणे, सुरेश वणे, विश्र्वनाथ वणे. निवोशी वेलेवाडीमधील गणेश महाडिक (माजी ग्रामपंचायत सदस्य) यांच्यासह त्यांचे 8 कार्यकर्ते, वेळंबमधील रोशन काताळकर आणि संतोष जोशी. यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. यामध्ये महिला मंडळांच्या 6 पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. अशा प्रकारे एकूण 47 जणांचे आज भाजपमध्ये स्वागत करण्यात आले.