महाराष्ट्र पुन्हा निर्बंधात, परिवहन मंत्री परब यांची अधिवेशनात घोषणा
मुंबई, ता. 24 : राज्यात देखील गेल्या दोन दिवसात एक हजारापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण दिसून येत आहेत. ख्रिसमस उत्सव, लग्न समारंभ, नवीन वर्षाचे स्वागत यामुळे गर्दी वाढून संसर्गाचा धोका वाढण्याची मोठी शक्यता आहे. म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ प्रमाणे संपूर्ण राज्यात शुक्रवारी (ता. 24) मध्यरात्रीपासून काही अतिरिक्त निर्बंध लावण्याचे राज्य शासनाने निश्चित केले आहे. यामध्ये रात्रीची जमावबंदी (9.00PM to 6.00 AM Night Curfew in Maharashtra) हा सर्वात महत्त्वाचा निर्बंध आहे.
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, युरोप तसेच युकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे. जगातील ११० देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. राज्यात संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी जबाबदारीने आरोग्याचे नियम पाळणे, मास्क व्यवस्थित वापरणे आवश्यक आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने देखील सर्व राज्यांसाठी संसर्ग रोखण्याकरिता पुरेशी काळजी घेण्यास व उपाययोजना करण्यास सांगितले आहे. सध्याच्या निर्बंधाचे स्वरूप हे प्राथमिक स्वरूपाचे असून ते आत्ताच न लावल्यास भविष्यात अधिक कठोर निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते. ( Night Curfew in Maharashtra )
Chief Minister Uddhav Thackeray has said that the number of patients in Europe and the UK is doubling due to the omicron variant. Omycron has spread to 110 countries around the world. In order to prevent the spread of infection in the state, everyone must follow the rules of health responsibly and use masks properly. The Union Health Department has also asked all the states to take adequate care and measures to prevent infection. The current restrictions are of a preliminary nature and if they are not imposed now, it may be time to impose more stringent restrictions in the future. ( Night Curfew in Maharashtra )


महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरु आहे. या अधिवेशनामध्ये परिवहन मंत्री अनिल परब यांनी या निर्बंधांविषयी माहिती दिली. The winter session of the state of Maharashtra is currently underway in Mumbai. Transport Minister Anil Parab informed about these restrictions in the convention.


काय आहेत निर्बंध
आज दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या आदेशात खालीलप्रमाणे अतिरिक्त निर्बंध असतील.
संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत बंदी असेल. ( Night Curfew in Maharashtra )
लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.
इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.
उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशा ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी २५ टक्के उपस्थिती असेल. अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना २७ नोव्हेंबर २०२१ चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.
उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.
याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.