03.09.2020
गुहागर : चिपळूण तालुक्यातील तनाळी नावलेवाडी येथे पंचायत समिती सेस फंडातून बांधण्यात आलेल्या गणपती विसर्जन घाटाचे उद्घाटन पंचायत समिती सदस्या अनुजा जितेंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी गावचे उपसरपंच जयेश बोबले, माजी उपसरपंच डिंगणकर, तनाळी गावचे माजी अध्यक्ष काशिनाथ बोबले, तनाळीचे शिवसेना शाखाप्रमुख सुधाकरजाधव, माजी सभापती पप्या चव्हाण व वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी वाडीच्या वतीने अनुजा जितेंद्र चव्हाण यांचे आभार मानण्यात आले. तसेच गावाच्यावतीने त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन उपसरपंच जयेश बोबले यांनी केले.