पत्रकारांनी नाराजीसह निषेध व्यक्त केला
गुहागर : गुहागर तालुक्यात सध्या व्हेल माशाच्या उलटीचा प्रकार गाजत आहे. एवढेच नव्हे तर तो चवीने चर्चिला जात आहे. असाच काहीसा उलटसुलट प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षाकडून घडून आला आहे. नियोजित वेळेपेक्षा तब्बल चार तासाने गुहागर येथील सभेला आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सभेच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पत्रकारांना पाहून त्यांना एकप्रकारे ‘उलटी’ आल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी सभेला सुरुवात होण्यापूर्वीच पञकारानी येथून जावे, असा ‘चलेजाव’ चा एकप्रकारे सूचना दिल्याने पत्रकारांना आश्चर्याचा धक्काच बसला. नियोजित कार्यक्रम उशिरा सुरू झाल्याने आलेल्या कार्यकर्त्यांनी घरचा रस्ता धरला.
journalists should leave before the meeting starts,The journalists were shocked when they were instructed to ‘Chalejao’. As the planned event started late, the activists who came took the road home.
गुहागर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची सभा मोडकाआगर येथील पूजा मंगल कार्यालयात काल गुरूवारी दुपारी दीड वाजता आयोजित करण्यात आली होती. या सभेला राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील पञकाराना निमंत्रित केले होते. दुपारी दीड वाजता सुरु होणाऱ्या या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तब्बल चार तास उशिरा आले. त्यामुळे ही सभा संध्याकाळी 4.30 वाजता सुरु झाली. सभा सुरू होण्यापूर्वीच जयंत पाटील यांनी पञकाराना पाहून तुम्ही येथून जा, तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे आहेत ते सभेनंतर विचारा असे सांगून पत्रकारांना बाहेरचा रस्ता दाखविला. त्यानंतर सगळेच पत्रकार बाहेर पडले. मुळात या कार्यक्रमाला यावे असे निमंत्रण तालुका राष्ट्रवादीकडून देण्यात आले असताना पक्षाच्या वरिष्ठांकडून अशाप्रकारच्या कृतीमुळे पत्रकारांनी नाराजी व्यक्त करून निषेध केला. पोलिसांनाही भर उन्हात ताटकळत रहावे लागले.